Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रशॉर्टसर्किटमुळे एसटीला आग; चालकाच्या सतर्कतेमुळे टळली मोठी दुर्घटना

शॉर्टसर्किटमुळे एसटीला आग; चालकाच्या सतर्कतेमुळे टळली मोठी दुर्घटना

ठाणे | Thane

आज सकाळी ठाण्याहून (Thane) भिवंडीकडे (Bhiwandi) निघालेल्या एसटी बसच्या (ST Bus) स्टार्टरमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग (Fire) लागल्याची घटना घडली. ही बाब बस चालकाच्या निदर्शनास येताच त्याने दिलेल्या माहितीनंतर प्रवाशी बसमधून खाली उतरले. बस चालकाच्या या सतर्कतेमुळे ७० प्रवाशी बचावले आहेत…..

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, ठाणे स्थानकातील राज्य परिवहन उपक्रमाच्या आगारातून शुक्रवारी सकाळी ठाणे-भिवंडी ही बस निघाली. या बसमध्ये ७० प्रवासी होते. भिवंडी आगाराची ही बस असून तिचा क्रमांक एमएच १४ बीटी १८९७ असा आहे.

अब्दुल सत्तारांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका; म्हणाले, छोटा पप्पू…

ही बस ठाण्यातील टेंभीनाका परिसरातील जैन मंदिर जवळ येताच बसच्या स्टार्टरमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. ही बाब बस चालक आनंद यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तातडीने ही बाब प्रवाशांना सांगितली.

कोटंबी घाटात पुन्हा अपघात; दोन बसेसची धडक

त्यानंतर घाबरलेल्या प्रवाशांची बसमधून खाली उतण्यासाठी धावपळ सुरू झाली. बसच्या दाराजवळ गर्दी असल्यामुळे काही प्रवासी खिडकीतून खाली उतरले.

त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना बसमध्ये लागलेली आग विझविण्यात यश आले. बस चालकाच्या सतर्केमुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

उठा तयारीला लागा! राज्यात १४ हजार पदांसाठी होणार पोलीस भरती

- Advertisment -

ताज्या बातम्या