Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याएसटी संपावर अखेर तोडगा? उद्या संप मिटण्याची शक्यता

एसटी संपावर अखेर तोडगा? उद्या संप मिटण्याची शक्यता

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी येण्याची शक्यता आहे. गेल्या चार महिन्यांपासून सुरु असलेला एसटीचा संप (ST Strike) मिटण्याची चिन्हे दिसत आहेत….

- Advertisement -

एसटी संपाबाबत विधान भवनात महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. ही बैठक विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर यांच्या दालनात झाली. ही बैठक सकारात्मक झाली असून उद्या संप मिटण्याची दाट शक्यता आहे.

गेल्या चार महिन्यांपासून प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर असलेली लालपरीची चाके थांबली आहेत. या संपावर तोडगा निघत नव्हता; अखेर आज एसटी संपाबाबत विधानभवनात चांगली आणि सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती असून उद्या याबाबत गुड न्यूज मिळण्याची शक्यता आहे.

विधानपरिषद सभापती बैठकीतून निघालेल्या तोडग्याबाबत सभागृहात माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे हा संप मिटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

परिवहन मंत्री अनिल परब विधानपरिषदेत निवेदन करतील. या बैठकीत सर्वपक्षीय आमदारांची समितीचे आणि एसटी कामगार प्रतिनिधींचे एकमत झाल्याची माहिती आहे. त्यामुळे एसटीचा प्रदीर्घ काळ सुरु असलेला संप मिटण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या