SSR : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

शरद पवार यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून पुन्हा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता
SSR : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई | Mumbai

काल सुप्रीम कोर्टाने (supreme court) अभिनेता सुशांतसिंग राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश दिला. यावर राष्ट्रवादी कॉंग्रसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी Twitter द्वारे प्रतिक्रिया दिली आहे.

SSR : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
आ.रोहित पवार म्हणाले भाजप नेत्यांना 'साष्टांग दंडवत'

शरद पवार यांनी म्हंटले आहे की, “सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील तपास सीबीआयच्या स्वाधीन करण्याचा आदेश दिला आहे. मला खात्री आहे की महाराष्ट्र सरकार या निर्णयाचा आदर करून चौकशी प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करेल. मला आशा आहे की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयमार्फत २०१४ मध्ये सुरू झालेल्या आणि अद्याप निराकरण होऊ न शकलेल्या चौकशी प्रक्रियेप्रमाणे या तपासकार्याची परिणती होणार नाही.”

शरद पवार यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून पुन्हा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com