Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याSSC Result : निकाल 18 टक्क्यांनी वाढला

SSC Result : निकाल 18 टक्क्यांनी वाढला

मुंबई Mumbai

दहावीचा निकाल (SSE Result) मागील वर्षीपेक्षा यंदा खूप जास्त लागला आहे. मागच्या वर्षी 77.10 टक्के निकाल होता. यंदा राज्याचा निकाल 95.30 टक्के एवढा लागला आहे. म्हणजेच निकालात तब्बल 18.2 टक्के वाढ झाली. अंतर्गत मूल्यमापन, तोंडीपरीक्षा, कृतीपत्रिका आणि भूगोलाचे सरासरी गुण दिल्यामुळे यावर्षी जास्त निकाल लागला असल्याचे शकुंतला काळे यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

विभागनिहाय निकालात काेकण अव्वल

कोकण – 98.77 टक्के

पुणे – 97.34 टक्के

नागपूर – 93.84 टक्के

औरंगाबाद – 92 टक्के

मुंबई – 96.72 टक्के

कोल्हापूर – 97.64 टक्के

अमरावती – 95.14 टक्के

नाशिक – 93.73 टक्के

लातूर – 93.09 टक्के

दहावीचा निकाल जाहीर; रद्द पेपरचे काय होणार?

मुलींचा 96.91 तर मुलांचा 93.90 टक्के निकाल

यंदाही निकालात मुलींची बाजी असलेली पाहायला मिळत आहे. यंदा 96.91 टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण तर 93.90 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा 3.01 टक्क्यांनी जास्त आहे.

कसा पाहाल निकाल ?

mahresults.nic.in

maharashtraeducation.com

results.mkcl.org

mahahsscboard.maharashtra.gov.in

दुसऱ्या दिवशीपासून उद्यापासून गुण पडताळणी करता येणार

ऑनलाईन निकालानंतर लगेचच उद्यापासून दिवसापासून विद्यार्थ्यांना अनिवार्य विषयांत (श्रेणी विषय वगळता) मिळालेल्या गुणांची पडताळणी (रिचेकिंग) किंवा उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी, पुनर्मूल्यांकन, स्थलांतर प्रमाणपत्र यासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने स्वतः किंवा शाळेमार्फत अर्ज करता येईल.गुणपडताळणीसाठी 30 जुलै ते 8 ऑगस्टपर्यंत,छायाप्रतीसाठी 30 जुलै ते 18 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येईल.

उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी उत्तरपत्रिकेची छायाप्रत अनिवार्य असून, छायाप्रत मिळाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्यापुढील पाच दिवसांत अर्ज करावा. दहावीत सर्व विषयांसह उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रेणी/गुणसुधार योजनेअंतर्गत जुलै-ऑगस्ट 2020 आणि मार्च 2021 अशा दोन संधी उपलब्ध राहतील, असे शकुंतला काळे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या