SSC Result 2021 : नाशिक विभागाचा निकाल तब्बल ९९.९६ टक्के; पाहा विभागीय मंडळ निहाय निकाल...

Result
Result

मुंबई | Mumbai

दहावीचा निकाल नुकताच जाहीर (Maharashtra 10th result) झाला आहे. दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. कोरोनामुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल तयार करुन हाच निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील (Dinkar Patil) निकालासंदर्भातली माहिती दिली आहे. जाणून घ्या विभागीय मंडळ निहाय निकाल...

Result
SSC result दहावीत सर्वच विद्यार्थी पास, असा पाहा तुमचा निकाल

राज्य माध्यमिक व उच माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत २०२१ मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येणार आहे.

यंदा दहावीचा निकाल ९९.९५ टक्के लागला आहे. १५ लाख ७४ हजार ९९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. निकालात पुन्हा मुलींनी बाजी मारली आहे. विद्यार्थिनी पुन्हा अव्वल असून मुलींच्या निकालाची टक्केवारी 99.96 टक्के इतकी आहे. मुलांची टक्केवारी 99.94 टक्के असून राज्यातील 22 हजार 384 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे.

विभागीय मंडळ निहाय निकाल

पुणे : ९९.६५ टक्के

नागपूर :९९.८४ टक्के

औरंगाबाद :९९.९६ टक्के

मुंबई :९९.९६ टक्के

कोल्हापूर :९९.९२ टक्के

अमरावती :९९.९८ टक्के

नाशिक : ९९.९६ टक्के

लातूर :९९.९६ टक्के

कोकण :१०० टक्के

परीक्षा निकालाची प्रक्रिया सगळीच नवीन असून तरीही वेळेत काम पूर्ण झाले आहे. सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली असल्याची प्रतिक्रिया दिनकर पाटील दिली आहे. श्रेणी सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांना संधी मिळणार असल्याचेदेखील पाटील यांनी सांगितले आहे.

असा पाहा निकाल

  • ssc.ac.in आणि mahahsscboard.in जा

  • SSC BOARD RESULT या पर्यायावर क्लिक करा.

  • या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा सीट नंबर टाइप करा. सीट नंबर स्पेसशिवाय टाइप करा.

  • आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाका.

  • लगेचच तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

  • तुम्हाला तो निकाल डाऊनलोड करता येणार आहे. विद्यार्थी संदर्भासाठी निकालाचे प्रिंटआउटही काढू शकणार आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com