SSC Result 2021 : जाणून घ्या, नापास होणारे 0.05 टक्के विद्यार्थी आहेत तरी कोण?

SSC Result 2021 : जाणून घ्या, नापास होणारे 0.05 टक्के विद्यार्थी आहेत तरी कोण?

मुंबई | Mumbai

यंदा इयत्ता दहावीचा निकाल (SSC Result) ९९.९५ टक्के लागला आहे. करोनामुळे (Corona) इयत्ता १० वीच्या परीक्षा झाल्या नाही. त्यांमुळे विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला निकाल (Result) जाहीर करण्यात आला आहे. शिक्षण मंडळाने पत्रकार परिषदेत निकालाबाबत माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता ऑनलाइन निकाल (Online Result) पाहता येणार आहे. यंदाच्या परीक्षेत ०.०५ टक्के अनुत्तीर्ण ठरविण्यात आले आहेत. जाणून घ्या कोण आहेत हे विद्यार्थी...

SSC Result 2021 : जाणून घ्या, नापास होणारे 0.05 टक्के विद्यार्थी आहेत तरी कोण?
SSC Result 2021 : नाशिक विभागाचा निकाल तब्बल ९९.९६ टक्के; पाहा विभागीय मंडळ निहाय निकाल...

गेल्या वर्षभरात जे विद्यार्थी शाळांच्या संपर्कात नव्हते असे विद्यार्थी अनुत्तीर्ण (Failed) झाले आहेत. यंदा एकूण १ हजार ४०० विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. ४९२२ विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. त्यात ३६८ एटीकेटीचे विद्यार्थी व ९१६ पुनर्परीक्षार्थींचा समावेश आहे.

SSC Result 2021 : जाणून घ्या, नापास होणारे 0.05 टक्के विद्यार्थी आहेत तरी कोण?
SSC result दहावीत सर्वच विद्यार्थी पास, असा पाहा तुमचा निकाल

राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५ लाख ७५ हजार ८०६ नियमित विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेस नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ७४ हजार ९९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

२७ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्याथ्र्यांपैकी ६ लाख ४८ हजार ६८३ विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, ६ लाख ९८ हजार ८८५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, २ लाख १८ हजार ७० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ९ हजार ३५६ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com