Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रदहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करावे

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करावे

मुंबई :

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विविध विषयावर भाष्य केले. लॉकडाऊन, कोरोना, शिक्षण, शेतकरी विविध विषयांवर त्यांनी मते मांडली. यावेळी राज ठाकरे यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाली. त्याची माहिती त्यांनी दिली. लॉकडाऊनबाबत भेटण्याासाठी मी त्यांना विनंती केली होती, पण त्यांच्या आजुबाजूल कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्ण असल्याने ते क्वारंटाइन आहेत. त्यामुळे आमच्यात झूमवर बोलणे झाल्याचे राज ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

दहावी-बारावी विद्यार्थ्यांना प्रमोट करा, छोट्या व्यापाऱ्यांना आठवड्यातून 2-3 दिवस दुकानं उघडण्यासाठी सूट द्या, खेळाडूंना जीम, स्वीमिंग पूलमध्ये सवलत द्या, बँकाची जबरदस्ती वसुली थांबवा, मनोरंजन क्षेत्र, सलून यांनाही आठवड्यातून दोन-तीन वेळा दुकाने सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशा विविध मागण्या केल्या.

शाळा : शाळा बंद आहे, तरी फी आकारणे सुरुच आहे. विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेले आहे. शाळांनी विद्यार्थ्यांची फी आर्धी घ्यावी, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्यांना प्रमोट केले पाहिजे. विद्यार्थ्यांप्रमाणे शाळांचाही विचार सरकारने करावा.

उत्पादन : छोट्या व्यापाऱ्यांना उत्पादन करण्यास सांगितलं मात्र विक्री करण्यास मनाई केली. अशा व्यापाऱ्यांसाठी आठवड्यांतून दोन किंवा तीन वेळा दुकानं खुली ठेवण्यास परवानगी दिली

बँक : लोकांकडे पैसे असतील तर त्यांना बँकांकडे जातील. सरकारने बँकांशी बोलून घ्यावं. बँक सक्तीने पैसे वसूल करत आहेत. नियमावली ३० एप्रिलपर्यंत आहे तोपर्यंत

वीज बिल माफ करणे : व्यायसायिकांना वीज बिल माफी द्यावी, लोकांना दिलासा देणं गरजेचं आहे. निर्बंधांच्या काळातील वीज बिल सरकारने माफ करावं

कंत्राटी कामगार : अनेक कंत्राटी कामगार सरकारने घेतलं होतं. या कामगारांना परत बोलवा, त्यांना महापालिकेत कायमस्वरुपी घ्यावं. कंत्राटी कामगारांच्या विषयाकडे लक्ष द्यावं.

क्रीडा क्षेत्र : सराव करणाऱ्या सर्व खेळांडूना परवानगी मिळणं आवश्यक आहे. गर्दी होणार नाही, परंतु सराव करायला मंजुरी मिळावी.

शेतकरी : राज्य सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा. एकदा शेतकरी कोसळला तर पुन्हा संकट आपल्यावर येईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या