
मुंबई | Mumbai
मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Minister of State Bachchu Kadu) यांनी महत्तवाचं वक्तव्य केलं आहे.
मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात याव्या अशा सूचना शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बैठकीत केल्या आहेत. मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा एक महिना पुढे ढकलावी, अशी सूचना राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शिक्षण उपसंचालकांसोबत झालेल्या ऑनलाइन बैठकीत केली.
मागील दोन वर्षांच्या काळात शालेय विद्यार्थ्यांना अभ्यास आणि लिखाणाचा सराव झालेला नसल्याने ही मागणी केली जात होती. मुलांचा लिखाणाचा सराव सुटल्याने त्यांना परीक्षेत अडचणी निर्माण होऊ शकतात.
तसेच, राज्यात सध्या शाळांबाबत ऑनलाइन-ऑफलाईनचा जो काही घोळ सुरू आहे त्यामुळे देखील विद्यार्थी संभ्रमात आहेत. म्हणून मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात याव्या अशा सूचना कडू यांनी या बैठकीत केल्या.
इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा १४ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत. तर प्रात्यक्षिक परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधित घेतली जाणार आहे. तसेच इयत्ता दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान होणार आहे.
इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधित घेतली जाणार आहे. तर लेखी परीक्षा ही ४ मार्च ते ३० मार्च दरम्यान होणार आहे.