दहावी परीक्षा :याचिकाकर्त्यास ठार मारण्याची धमकी

दहावी परीक्षा :याचिकाकर्त्यास ठार मारण्याची धमकी

पुणे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १० वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला होता. सरकारच्या या निर्णयाविरोधात पुण्यातील माजी अधिसभा सदस्य धनंजय कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावरून त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दहावी परीक्षा :याचिकाकर्त्यास ठार मारण्याची धमकी
'असा' लागणार दहावीचा निकाल!, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा

पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनला दाखल तक्रारीत धनंजय कुलकर्णी यांनी म्हटले की,दहावी विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीकोनातून या परीक्षा पुन्हा घ्याव्यात या मागणीसाठी मी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचाच राग मनात धरत फेसबुकच्या माध्यमातून दोन जणांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. कोरोनाकाळात परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांच्या जीवास धोका निर्माण झाल्यास तुम्हाला जबाबदार धरण्यात येईल असं या दोघांनी धमकावले आहे. प्रथमेश पाटील आणि भगवान ढाकणे असे जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांची नावे आहेत.

Related Stories

No stories found.