आजपासून दहावीची परीक्षा

विद्यार्थीसंख्येत यंदा मोठी घट
आजपासून दहावीची परीक्षा

पुणे । प्रतिनिधी Pune

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत ( State Board of Secondary and Higher Secondary Education)घेण्यात येणार्‍या इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेला (SSC Examination )आजपासून सुरुवात होत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

सर्व विभागीय मंडळातून परीक्षा देणार्‍या विद्यार्थीसंख्येत यंदा मोठी घट झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत 61 हजार 708 विद्यार्थीसंख्या कमी आहे. यंदा राज्यभरातून 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. सीबीएसई, आयसीएसई माध्यमाच्या शाळांकडे असणारा विद्यार्थ्यांचा कल आणि पालकांकडून एकच अपत्याचा घेतला जाणारा निर्णय यामुळे विद्यार्थीसंख्या घटल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. यावेळी मंडळाच्या सचिव डॉ. अनुराधा ओक उपस्थित होत्या.

राज्य मंडळाच्या सर्व नऊ विभागीय मंडळाच्या वतीने 2 ते 25 मार्च या कालावधीत लेखी परीक्षा होत आहे. यंदा 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये 8 लाख 44 हजार 116 विद्यार्थी आणि 7 लाख 33 हजार 67 विद्यार्थिनींनी नोंदणी केली आहे. तसेच 8 हजार 189 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर 73 तृतीयपंथी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. एकूण 23 हजार 10 माध्यमिक शाळांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून, या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी 5 हजार 33 मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.

गेल्या पाच वर्षातील विद्यार्थ्यांची संख्या

मार्च 2019 16 लाख 99 हजार 465

मार्च 2020 17 लाख 65 हजार 829

मार्च 2021 16 लाख 58 हजार 614

मार्च 2022 16 लाख 38 हजार 964

मार्च 2023 15 लाख 77 हजार 256

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com