दहावीचा निकाल जाहीर; रद्द पेपरचे काय होणार?
मुख्य बातम्या

दहावीचा निकाल जाहीर; रद्द पेपरचे काय होणार?

राज्याचा ९५.३० टक्के निकाल

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

मुंबई : अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून असलेला दहावीचा निकाल आज जाहीर झाला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकालाबाबत पत्रकार परिषद घेत बोर्डाने पत्रकार परिषद घेत निकाल जाहीर केला.

यंदा राज्याचा निकाल तब्बल ९५.३० टक्के इतका लागला असून विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता आपला निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे. हा निकाल mahresult.nic.in.या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन पाहता येईल.

दरम्यान, यंदा दहावीचा करोनामुळे शेवटचा पेपर रद्द करावा लागला होता. यामुळे या पेपरचे गुण बोर्डाकडून कसे दिले जातील याबाबत साशंकता होती.

भूगोलाचा पेपर रद्द झाल्याने शिक्षण मंडळ विद्यार्थ्याला इतर पेपरमधील गुणांच्या सरासरीनुसार भूगोलाचे गुण दिले जाणार आहेत.

रद्द झालेल्या पेपरबाबतची नोटीस बोर्डाकडून जाहीर करण्यात आली होती. तसेच ९ वी आणि अकरावीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांनाही पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय महाराष्ट्र बोर्डाने घेतल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com