Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यामविप्र निवडणूक : श्रीराम शेटेंच्या नावाची पुन्हा चर्चा

मविप्र निवडणूक : श्रीराम शेटेंच्या नावाची पुन्हा चर्चा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेवर (Maratha Vidya Prasarak Samaj Sanstha) आपलीच सत्ता रहावी, यासाठी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी कंबर कसत जोरदार प्रयत्न सुरू आहेत…

- Advertisement -

निवडणुकीत (Election) तिथेही कमी पडणार नाही,यासाठी दोन्ही पॅनलकडून व्यूहरचना राजकीय आराखडे आखताना विशेष काळजी घेतली जात असल्याचे चित्र आहे.

प्रतिस्पर्धी गटाचा धुव्वा उडविण्यासाठी सत्ताधारी व विरोधकांकडून सक्षम उमेदवारांचा शोध वेगाने सुरू आहे. त्यामुळे पॅनल निर्मितीची प्रक्रिया कासवगतीने सुरू असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या तीन दिवसात या प्रक्रियेला चांगलाच वेग येणार आहे.

मविप्र संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी (MVP Election) गावा-गावांमध्ये जात दोन्ही पंलकडून सभासद मतदारांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न इच्छुकांकडून केला जात आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हाभर प्रचाराचा धुरळा उडला आहे.

नाराजांना आपल्यात सामावून घेण्याचे धोरण सत्ताधारी व विरोधकांनीही अवलंबले आहे.त्यामुळे दोन्ही गटांकडे इच्छुकांची संख्या वाढली आहे,असा दावा केला जात आहे. उमेदवारी देताना संबंधित पॅनलच्या नेत्यांचीही यामुळे कसोटी लागणार असे चित्र आहे.

सरचिटणीस पदासाठी सत्ताधारी गटाकडून नीलिमा पवार (Nilima Pawar) तर विरोधकांकडून अ‍ॅड. नितीन ठाकरे (Nitin Thakare) यांच्यात सरळ लढत होणार हे स्पष्ट आहे.

उर्वरित पदांसाठी तुल्यबळ उमेदवार देण्यासाठी दोन्ही गटांकडून प्रयत्न सुरू आहेत. अ‍ॅड. ठाकरे पॅनलकडून अध्यक्षपदासाठी सिन्नरचे आमदार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचे नाव आघाडीवर आहे, तर अ‍ॅड. कोकाटे यांच्या विरोधात मागील निवडणुकीत सर्वाधिक मते घेणाऱ्या डॉ. सुनील ढिकले (Sunil Dhikle) यांना मैदानात उतरविण्याची रणनीती पवार गटाने आखल्याची चर्चा असून विद्यमान अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे (Tushar Shewale) हेही या पदासाठी चर्चेत आहेत.

पुन्हा शेटेंभोवती राजकारण

मविप्र निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांच्या उमेदवारीबाबत मोठी चर्चा होती.मागील सप्ताहात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यावेळी श्रीराम शेटे यांच्या उमेदवारीबाबत जी खलबती झाली होती ती शरद पवार (Sharad Pawar) यांनी सर्वांसमोर कथन केली.

त्यांच्या दौऱ्यानंतर श्रीराम शेटे हे निवडणुकीतून बाजूला पडल्याचे चित्र असताना यामध्ये पुन्हा एक ट्विस्ट आला आहे. शेटे यांना शरद पवार यांनी पुन्हा बोलावणे धाडत निवडणुकीत सक्रिय होण्याचे आदेश दिले असल्याचे वृत्त आहे.त्यामुळे शेटे हे काय भूमिका घेतात ? याकडे मविप्र सभासदांचे लक्ष वेधले गेले आहे.जर शेटे हे पुन्हा सक्रिय झालेच तर ते कोणत्या गटाला झुकते माप देतात व आपली भूमिका स्पष्ट करतात ? याकडेही जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या