PHOTO : श्रीलंका मोठ्या आर्थिक संकटात; संतप्त जनता रस्त्यावर, राष्ट्रपतींच्या घरासमोर हिंसक आंदोलन

PHOTO : श्रीलंका मोठ्या आर्थिक संकटात; संतप्त जनता रस्त्यावर, राष्ट्रपतींच्या घरासमोर हिंसक आंदोलन

दिल्ली | Delhi

भारता शेजारील देश श्रीलंका (Sri Lanka) गेल्या काही काळापासून गंभीर आर्थिक संकटाचा (Economic Crisis) सामना करत आहे. जवळजवळ संपलेला परकीय चलनाचा साठा आणि कर्जाचा प्रचंड बोजा यामुळे श्रीलंकेवर दिवाळखोरीचा धोका निर्माण झाला आहे.

डॉलरच्या तुलनेत श्रीलंकेच्या चलनाचे मूल्य जवळपास निम्म्यावर आले आहे, त्यामुळे अनेक महत्त्वाच्या वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये अराजकता पसरली असून लोक रस्त्यावर निदर्शनांसाठी उतरले आहेत.

गुरुवारी रात्री उशीरा येथील स्थानिकांनी राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे (Sri Lankan President Gotabaya Rajapaksa) यांच्या घराबाहेर आंदोलन केलं. हे आंदोलन रोखण्यासाठी स्पेशल टास्क फोर्स आणि अर्धसैनिक दलाचा वापर करण्यात आला. या प्रकरणी ४५ जणांना अटक करण्यात आली आहे. या ठिकाणी सध्या कर्फ्यु (Curfew) लावण्यात आला असून वातावरण गंभीर बनले आहे.

दरम्यान श्रीलंकेत महागाईचा आगडोंब पाहायला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस खरेदी करण्यासाठी लोकांना मोठमोठ्या रांगा लावाव्या लागत आहेत. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की एक किलो साखरेसाठी २९० रुपये तर एक किलो तांदूळ घेण्यासाठी तब्बल ५०० रुपये मोजावे लागत आहेत.

तसेच एक कप चहासाठी १०० रुपये द्यावे लागत आहेत. तर ब्रेड, दूध यासारख्या पदार्थांसाठी देखील मोठी किंमत चुकवावी लागत आहे. ब्रेडचं एक पॅकेट १५० रुपयांना तर एक किलो दूध पावडर १९७५, एलपीजी सिलिंडर ४७७९, पेट्रोल २५४ तर डिझेल १७६ रुपये प्रति लीटर आहे.

तसेच डिझेल नसल्याने १३ तासांहून अधिक काळ श्रीलंकेत ब्लॅकआऊट होता.तसेच वीज पुरवठा खंडित करण्याचा परिणाम सरकारी रुग्णालयांवरही पडला.

कोलंबो स्टॉक एक्सचेंजमध्ये ट्रेडिंगही केवळ अर्धा ते दोन तासामध्ये गुंढाळण्याचा निर्णय घ्यावा लागला.

तर वीज वाचवण्यासाठी अनेक ठिकाणी रस्त्यांवरील पथदिवेही बंद करण्यात आले आहेत. यावरून श्रीलंकेची आर्थिक स्थिती किती संकटात आहे, याचा प्रत्यय येतो.

Related Stories

No stories found.