Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याभारताकडून लंकेचा धुराळा

भारताकडून लंकेचा धुराळा

कोलंबो । वृत्तसंस्था Colombo

प्रेमदासा मैदानावर झालेल्या भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या एकदिवसीय सामन्यात ( Sri Lanka vs India- ODI ) श्रीलंकेच्या 263 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 36.4 षटकात 3 गड्यांचे बदल्यात आव्हान करत विजयी सलामी दिली. शिखर धवनने नाबाद 86 धावांची खेळी केली तर तर सुर्यकुमार यादवने नाबाद 31 धावांची खेळी करत विजयावर शिक्कामोर्तब केले.

- Advertisement -

विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना भारताकडून सलामीला पृथ्वी शॉ आणि शिखर धवन मैदानावर आले. पृथ्वी आणि धवन यांनी आक्रमक सुरूवात चौफेर फटकेबाजीस सुरूवात केली. सहाव्या षटकात भारताला पहिला धक्का बसला. धनंजय डिसिल्वाच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात अविष्काकडून तो झेलबाद झाला. पृथ्वीने आक्रमक फटकेबाजी करत 24 चेंडूत 9 चौकारांसह 43 धावा केल्या. त्यानंतर इशान किशन मैदानावर आला. त्यानेे देखील आक्रमक पवित्रा घेतला तर दुसरीकडून धवनने संयमी खेळ सुरू ठेवला.

मात्र 18 व्या षटकात भारताला दुसरा धक्का इशान किशनच्या रुपाने बसला. त्यावेळी भारताची धावसंख्या 2 बाद 142 अशी होती. लकशनच्या गोलंदाजीवर भानुकाने इशानचा झेल घेतला. इशान अर्धशतकी खेळी करताना 42 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांसह 59 धावांची खेळी केली. यानंतर मनीष पांडे 26 धावांवर बाद झाला.

तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 बाद 262 धावा केल्या. लंकेकडून चामिका करुणरत्नेने सर्वाधिक नाबाद 43 धावा केल्या. लंकेला अविष्का फर्नांडो आणि मिनोद भानूका यांनी चांगली सुरूवात करून दिली होती. या जोडीने पहिल्या बळीसाठी 49 धावा केल्या. अविष्काला बाद करत चहलने लंकेला पहिला धक्का दिला. त्यानंतर कुलदीप यादवने 17व्या षटकात पहिल्या आणि चौथ्या चेंडूवर बळी घेतला तेव्हा श्रीलंकेची अवस्था 1 बाद 84 वरून 3 बाद 89 अशी केली.

दीपक चहरने धनंजय डी सिल्वाला बाद करत लंकेला चौथा धक्का दिला. श्रीलंकेने 166 धावात पाच विकेट गमावल्या होत्या. चामिका करुणरत्ने, कर्णधार शनाका आणि चरित असालांका हे दोन खेळाडू वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. त्यांनी ठरावीक अंतराने विकेट गमावल्या. पण अखेरच्या षटकात लंकेच्या तळातील फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीमुळे त्यांना 250 धावांचा टप्पा पार करता आल्या. भारताकडून दीपक चहर, युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

शिखरचा नवा विक्रम

शिखर धवनच्या नेतृत्वात टीम इंडिया आज श्रीलंकेविरुद्ध पहिला वनडे सामना खेळत आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणारा एक संघ इंग्लंड दौर्‍यावर असल्याने लंकेला पाठवलेल्या नव्या दमाच्या टीम इंडियाची कमान धवनकडे आहे. तब्बल 142 आंतरराष्ट्रीय वनडे सामने खेळल्यानंतर धवन भारताचे नेतृत्व करत आहे. आज मैदानात उतरला तेव्हा त्याचे वय 35 वर्ष 225 दिवस इतके होते. याचबरोबर तो भारताचे वनडेमध्ये कर्णधार म्हणून पदार्पण करणारा करणारा सर्वात वयस्कर खेळाडू बनला. या यादीमध्ये दुसर्‍या स्थानी भारताचे माजी दिग्गज अष्टपैलू मोहिंदर अमरनाथ यांचा क्रमांक लागतो. या विक्रमात तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकावर अनुक्रमे सय्यद किरमाणी व अजित वाडेकर हे आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या