फोन हॅकींग प्रकरणात वादळ निर्माण करणारे पेगासस आहे काय?

फोन हॅकींग प्रकरणात वादळ निर्माण करणारे पेगासस आहे काय?
Pegasus

नवी दिल्ली

संसदेचे हिवाळी अधिवेशस (Monsoon Session)आजपासून सुरु झाले. कोरोना, महागाई, कृषी कायदासोबत पेगासस (Pegasus) नामक सॉफ्टवेअरमुळे हे अधिवेशन गाजणार आहे. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून भारतातील पत्रकार, राजकीय नेते व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचे फोन हॅक केल्याचा आरोप केला जात आहे. पेगासस सॉफ्टवेअर वापरून पत्रकारांवर पाळत ठेवण्यात येत होती, याची पुष्टी फॉरेन्सिक तपासातून झाल्याचा दावा केला आहे.

Pegasus
पुढील महिन्यात पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार कारण...

रविवार रात्री एक अहवाल बाहेर आला. त्यानुसार इस्त्रायल सॉफ्टवेयर पेगासस (Pegasus)च्या मदतीने भारतातील जवळपास ३०० जणांचे फोन हॅक (Phone Hacking) केले गेले. त्यात पत्रकार, मंत्री, नेता, उद्योगपती व सार्वजनिक जीवनातील अन्य मान्यवरांचा समावेश आहे. हा अहवाल वॉशिंग्टन पोस्टसह जगभरातील १६ माध्यमांनी प्रसिद्ध केला आहे.

काय आहे पेगासस?

पेगासस स्पायवेअर हे इस्रायलच्या NSO ग्रुपने तयार केलेलं आहे. 2016 मध्ये ही कंपनी चर्चेत आली कारण त्यावेळी एका अरब कार्यकर्त्याला त्याच्या मोबाईलवर एक संशयास्पद मेसेज आला. त्याला हे वाटत होते की पेगाससद्वारे आयफोन युजर्सचे फोन हॅक केले जात आहेत. सायबर सुरक्षेबाबत संशोधन करणाऱ्यांनी या गोष्टीला दुजोरा दिला. फेसबुकने देखील NSO ग्रुपच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. फेसबुकच्या सायबर सुरक्षेविषयी संशोधन करणारे संशोधक Pegasus काय करतं आहे याची माहिती वारंवार घेत होते तेव्हा त्यांना हे लक्षात आलं के पेगाससद्वारे भारतातील पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांची WhatsApp हॅक करण्यात आलं होतं.

पेगासस काम करते कसे?

ज्या व्यक्तीचा फोन हॅक करायचा आहे त्याला एक वेबसाईटची लिंक पाठवली जाते. ही लिंक ओपन झाली की पेगासस त्याच्या फोनमध्ये इन्स्टॉल होतं. शिवाय व्हॉईस कॉल सिक्युरीटी बग आणि व्हॉट्सएप यांच्या माध्यमातूनही पेगासस इन्स्टॉल केलं जाऊ शकतं.

पेगाससची सिस्टिम इतकी एडवांस आहे की युजरला मिसकॉल देऊन सुद्धा त्याचा फोन हॅक करता येऊ शकतो. संशोधकांच्या सांगण्याप्रमाणे, युझरच्या मोबाईलवर इन्स्टॉल झालं की त्याचे कॉल लॉग, व्हॉट्सएप चॅट पाहता येतात. व्हॉट्सएपचे मेसेज वाचणं, कॉल ट्रॅक करणं, युझरची अॅक्टिव्हिटी पाहणं या सगळ्या गोष्टी या पेगाससमुळे सहजरित्या केल्या जाऊ शकतात.

कंपनीचे स्पष्टीकरण

Pegasus स्पायवेयर एक सॉफ्टवेयर जो व्हाट्सएपसारखे ऍप व फोनमधील अन्य एप्लिकेशन हॅक करते. इस्त्रायलमधील कंपनी NSO Group ने हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर NSO ग्रुपने स्पष्टीकरण दिले. कंपनीनुसार माध्यमांमध्ये जे आरोप लावले गेले आहे, ज्या बातम्या दिल्या गेल्या आहेत ते चुकीचे आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com