Sputnik V लसीच्या एका डोसची किंमत किती ? आज जाहीर झाला दर

हैद्राबादमधील व्यक्तीस पहिला डोस : जुलैपासून देशात होणार उत्पादन
Sputnik V लसीच्या एका डोसची किंमत किती ? आज जाहीर झाला दर

नवी दिल्ली

भारतात रशियाच्या 'स्पुटनिक व्ही' (Sputnik V)लसीचे लसीकरण पुढील आठवड्यापासून सुरु होणार आहे. आता स्पुटनिक (Sputnik V) या लसीची किंमत जाहीर करण्यात आली आहे. भारतात ही लस 948 रुपयात अधिक 5 टक्के जीएसटी अशी 995.40 मध्ये ही लस मिळणार आहे. भारतात स्पुतनिक लस आयात करणारी कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने ही माहिती दिली आहे. या डोसला सेंट्रल ड्रग्स लॅबोरेटरीजकडून आवश्यक परवानग्या मिळाल्या असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

यामुळे देशातील लसीकरणाचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. भारतात पुढील पाच महिन्यात २ कोटी डोस येणार आहेत. तसेच ऑक्टोंबरपासून 'स्पुटनिक व्ही' लसीचे उत्पादन भारतात सुरु होणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

Sputnik V लसीच्या एका डोसची किंमत किती ? आज जाहीर झाला दर
अखेरी राज्यातील लॉकडाऊन १ जूनपर्यंत वाढवला

डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने स्टॉक एक्सचेंजला स्पुतनिकच्या डोसच्या किंमतीबाबत माहिती दिली आहे. या लसीचेही दोन डोस घेणं बंधनकारक आहे. रेड्डीज लॅबने या व्हॅक्सिनची सॉफ्ट लॉन्चिंग करताना शुक्रवारी हैदराबादमधील एका व्यक्तीला या लसीचा पहिला डोस दिला. या लसीची पहिली खेप 1 मे रोजी भारतात आली होती. तसेच या लसीला 13 मे रोजी सेंट्रल ड्रग्स रेग्युलेटरीने मंजुरी दिली आहे. या लसीची आणखी एक खेप आयात केली जाणार असून त्यानंतर या लसीची जूनपासून भारतातच निर्मिती केली जाणार आहे.

किंमत कमी होणार

भारतात या लसीची निर्मिती झाल्यास त्याची किंमत कमी होईल. भारतात सहा लसी तयार करणाऱ्या कंपन्यांशी या लसीच्या उत्पादनाबाबत चर्चा सुरू आहे. दरम्यान, निती आयोगाच्या एका सदस्याने डिसेंबरपर्यंत देशात कोविड व्हॅक्सिनेच 200 कोटीहून अधिक डोस भारताला उपलब्ध होतील असा दावा कलेा आहे.

रशियाची करोना लस स्पुटनिक व्ही ही करोनावर 91.5 टक्के प्रभावी असल्याचा दावा लस निर्मिती कंपनीने केला आहे. लसीच्या चाचणीच्या अहवालाचा अभ्यास केल्यानंतर लस 91.5 टक्के प्रभावी असल्याचं समोर आलं आहे, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. पहिल्यांदा केलेल्या चाचणीत लस 92 टक्के प्रभावी दिसली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील चाचणीत लस 91.4 टक्के प्रभावी असल्याचं समोर आलं

गामलेया रिसर्च सेंटर फॉर अॅपिडायमोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी या कंपनीने स्पुटनिक व्ही या कोरोना लसीची निर्मिती केली आहे. ही लस कोरोनाबाधित रुग्णांना शंभर टक्के बरे करणार, असा दावा कंपनीने केला आहे. या लसीच्या चाचणीचा संपूर्ण अहवाल लवकरच एका प्रतिष्ठित सायन्स जनरलमध्ये प्रकाशित करण्यात येईल, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

रशियाची करोना लस ही सर्वसामान्य सर्दी, तापाला कारण असाणाऱ्या Adenovirus वर आधारित आहे. या लसीला कृत्रिमरित्या तयार करण्यात आलं आहे. ही लस करोना विषाणूमधील स्ट्रक्चरल प्रोटीनची नक्कल करते. याचा अर्थ असा की, ही लस टोलच्यानंतर मानवी शरीर त्याचप्रकारे प्रतिक्रिया देते ज्याप्रकारे करोना विषाणूला प्रतिक्रिया देते. मात्र, करोनासारखा जीवघेणा त्रास होत नाही. या लसीचे मॉस्कोच्या सेशेनॉ युनिव्हर्सिटीमध्ये 18 जून रोजी चाचणी सुरु झाली होती. एकूण 38 स्वयंसेवकांवर या लसीची चाचणी करण्यात आली. या चाचणीत ही लस सुरक्षित असल्याची माहिती समोर आली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com