Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यासिंगल डोस असलेल्या 'या' लसीच्या वापराला परवानगी; ओमिक्रोनवर आहे १०० टक्के प्रभावी

सिंगल डोस असलेल्या ‘या’ लसीच्या वापराला परवानगी; ओमिक्रोनवर आहे १०० टक्के प्रभावी

नवी दिल्ली | प्रतिनिधी New Delhi

देशात सध्या सुरू असलेल्या करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला बळ मिळाले आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने सिंगल डोस स्पुटनिक लाइट (Single Dose Sputnik Light Vaccine) लसीच्या आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिलेली आहे. भारताने परवानगी दिलेली ही नववी लस आहे…

- Advertisement -

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी स्पुटनिक लाईटच्या आपत्कालीन वापराबाबत माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले, ‘DCGI ने भारतात सिंगल डोस स्पुतनिक लाइट कोविड-19 लसीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे.

कोविड विरुद्ध देशात राबविण्यात येणारी ही 9वी लस आहे. यामुळे महामारीशी लढण्यासाठी देशाच्या सामूहिक प्रयत्नांना अधिक बळ मिळेल. स्पुटनिक लाईट या रशियन लसीचा देशभरात वापर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी या लसीच्या वापराला परवानगी मिळाल्याची माहिती ट्विटरवरून दिली. Sputnik Lite ही एकच डोसवाली लस आहे. या लसीचा फक्त 1 डोस करोनाविरूद्ध प्रभावी आहे. स्पुटनिक लाइटचा एकच डोस ९३.५ टक्के प्रभावी आहे. तर ओमिक्रोनवर ही लस १०० टक्के प्रभावी असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या