Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्या'नाशिकरोड प्रॉपर्टी एक्स्पो' प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

‘नाशिकरोड प्रॉपर्टी एक्स्पो’ प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

युवकांपासून व्यावसायिक आणि ज्येष्ठ नागरिकांपासून महिलांपर्यंत विविध श्रेणीतील शेकडो नागरिकांच्या भेटीचा ओघ हे मनाशिकरोड प्रॉपर्टी एक्स्पोच्या (Property Expo) दुसर्‍या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले.

- Advertisement -

शनिवारची सायंकाळ स्वप्नातील घराच्या शोधात घालवून नाशिकरोड (nashik road) आणि परिसरातील नागरिकांनी वीकएण्ड चा पुरेपूर आनंद घेतला. देशदूत (deshdoot) आयोजित तसेच दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स (Deepak Builders & Developers) प्रायोजित नाशिकरोड प्रॉपर्टी एक्स्पो 2023 (Nashik Road Property Expo 2023) प्रॉपर्टी एक्स्पोत सहभागी बांधकाम व्यावसायिकांचे (builders) प्रकल्प मध्यमवर्गीयांपासून उच्च मध्यमवर्गीयांपर्यंत सर्वच घटकांना सुयोग्य पर्याय उपलब्ध करून देत आहेत. या पर्यायांना गृहवित्त पुरवठादार संस्थांची जोड लाभली आहे.

त्यामुळे हा दुग्धशर्करा योग मानून नागरिक सहकुटुंब गर्दी करीत आहेत. दुपारपासून गर्दीचा ओघ रात्री 9 पर्यंत सुरू होता. स्टॉलधारकांकडून प्रदर्शनात आलेल्या कुटुंबीयांना पूरक माहिती देण्यात आली. नाशिकरोड (nashik road) परिसरातील घरांचे पर्याय प्रत्यक्ष डोळ्यांत साठवता यावेत या उद्देशाने काही सहभागी बांधकाम व्यावसायिकांनी प्रत्यक्ष साईट व्हिजिटची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे.

सोनी गिफ्ट प्रा. ली. (Sony Gift Pvt. Ltd.) हे गिफ्ट पार्टनर (Gift partner) तर, स्पायडर मीडिया हाऊस (Spider Media House) हे प्रदर्शनाचे इव्हेंट पार्टनर (Event partner) आहेत. आज रविवारी प्रदर्शनाचा समारोप होत आहे. नागरिकांनी दुपारी 12 ते रात्री 9 या वेळेत प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

लकी ड्रॉ विजेते

डॉ. नितीन सुराणा यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आला. यामध्ये दिव्या जाधव आणि जानकी सोनार या भाग्यवान विजेत्यांना सोनी गिफ्टतर्फे बक्षिसे देण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या