Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशिकहून थेट कोलकत्याला या तारखेपासून विमानसेवा

नाशिकहून थेट कोलकत्याला या तारखेपासून विमानसेवा

नाशिक :

केंद्र शासनाची आंतर शहर आणि आंतरराज्यांना जोडणारी विमानसेवेमुळे नाशिकहून अनेक शहरे जोडली गेली आहेत. आता २९ मार्चपासून नाशिकहून थेट कोलकत्याला जोडणारी विमानसेवा सुरू होणार आहे. त्यासाठी स्पाईस जेटच्या विमानाचे बुकींग सुरु झाले आहे.

- Advertisement -

ओझर येथील विमानतळावरून गेल्या दीड ते दोन वर्षात माेठ्या प्रमाणात सेवा सुरू झाल्या आहेत. नाशिकहून बेळगावसाठी नवीन सेवा सुरू झाली आहे. त्यानंतर आता स्पाईस जेटने दिल्ली, हैदराबाद, बंगळूर पाठोपाठ आता कोलकाता सेवा सुरू करण्याची तयारी पुर्ण केली आहे. २९ मार्चपासून सहा दिवस (सोमवार ते शनिवार) ही विमानसेवा सुरु असणार आहे. दिल्ली-नाशिक विमानसेवाही चार दिवस सुरु आहे. ही विमानसेवा १ एप्रिलपासून सातही दिवस सुरु होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या