Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याआजपासून स्पाइसजेटची विमानसेवा

आजपासून स्पाइसजेटची विमानसेवा

सातपूर । प्रतिनिधी Satpur

नाशिकच्या विमानसेवेला ढेपाळत सुरुवात झाली असली तरी आता मात्र खर्‍या अर्थाने गती घेतली असल्याचे चित्र आहे. येणार्‍या काळात नाशिक विमानतळ वेगाने विकसित होणार आहे यात शंका नाही.

- Advertisement -

केंद्र सरकारने लागू केलेल्या उडान सेवेअंतर्गत सेवा देण्यासाठी विविध कंपन्यांनी नाशिकची निवड केली होती. मात्र प्रत्यक्षात मागील वर्षात केवळ दिल्ली व अहमदाबाद सेवा सुरू होऊ शकली. विमान कंपनीच्या गोंधळामुळे मागील सात-आठ महिन्यांपासून दिल्लीची सेवाही बंद पडली. त्यानंतर कोणी फारसा रस घेतला नव्हता.

मात्र, खा. हेमंत गोडसे व उद्योजक मनीष रावल यांनी सातत्याने या प्रश्नाचा पाठपुरावा केला. या पार्श्वभूमीवर नाशिकला आजपासून नाशिक-बंगळुरू, नाशिक-दिल्ली व नाशिक-हैदराबाद अशा तीन विमानसेवा स्पाइसजेट या विमान कंपनीच्या माध्यमातून सुरू करण्यात येत आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये हैदराबाद-नाशिक-अहमदाबाद-पुणे अशी ऑफिस लाईट सुरु आहे. यासोबतच नाशिक-अहमदाबाद ही विमानसेवाही सुरू आहे. या माध्यमातून प्रतिदिन दोनशे प्रवासी विमान सेवेचा लाभ घेताना दिसून येत आहेत, मात्र आजपासून सुरू होणार्‍या या नव्या तीन विमान सेवेमुळे हीच संख्या एक हजाराहून जास्त होण्याची शक्यता मनीष रावल यांनी व्यक्त केली.

नजिकच्या काळात नाशिकहून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी एचएएलला जबाबदारी देण्यात आली आहे. भविष्यात ही गोष्ट गतीने विकसित होऊन आंतरराष्ट्रीय उडाण सुरू झाल्यास नाशिक विमानतळ खर्‍या अर्थाने सक्षम होण्यास मदत होईल.

नाशिकमधून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध शेती उत्पादने पाठवली जातात त्यात प्रामुख्याने द्राक्ष, डाळिंब, कांदा, वाईन यांची संख्या जास्त आहे. यापूर्वी दिल्ली नाशिक विमान सेवेद्वारे मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतुकीची सोबतच कार्गो वाहतूक सक्षमपणे चालवली जात होती. त्यामुळे विमानसेवा सुरक्षितपणे सुरू होती. हीच सेवा आता त्यामुळे जास्त गतीने सुरू राहिली, असा विश्वास खा. हेमंत गोडसे यांनी व्यक्त केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या