गोव्याला जायचंय? नाशिकहून स्पाइस जेटचे चार मुख्य ठिकाणी उड्डाण होणार पूर्ववत

गोव्याला जायचंय? नाशिकहून स्पाइस जेटचे चार मुख्य ठिकाणी उड्डाण होणार पूर्ववत
Spice Jet

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक विमान तळावरून करोना काळात बंद करण्यात आलेल्या दिल्ली, बंगळुरू, हैद्राबाद आणि गोवा या चार प्रमुख ठिकाणांना जोडणारी विमानसेवा नव्याने पून्हा सूरू करण्याबाबत स्पाइस जेटकडून (Spice Jet) जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे....

करोनापूर्व काळात केंद्र सरकारच्या (Central Government) उडान (Udan) योजनेंतर्गत नाशिक विमानतळावरुन देशभरातील प्रमुख शहरांना जोडणार्‍या विकान सेवा सूरू होत्या.

त्यांना चांगला प्रतिसादही लागत होता. नाशिकसाठी दिल्ली (Delhi), बंगळूरू (Bangalore), हैद्राबाद (Hyderabad), अहमदाबाद (Ahmadabad), पुणे (pune), बेळगाव (Belgaum) ,हिंदण (Hindan) अशा शहरांसाठी विमानसेवा नियमित सुरू होती. मात्र करोनानंतर विमान सेवा विस्कळीत झाली होती. करोना नंतरच्या काळात आता अहमदाबाद, पुणे, दिल्ली, बेळगाव या शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे.

करोना निर्बंध (Covid Guidlines) शिथील झाल्यापासून गेल्या काही काळात स्पाइस जेट विमान (Spice Jet) कंपनीकडून नव्याने सर्व शहांसाठी विमान सेवा पून्हा सूरू करण्याच्या हालचाली गतिमान करण्यात आल्या आहेत. त्यात प्रामुख्याने दिल्ली, बंगळूरू, हैद्राबाद,अहमदाबाद आणि गोवा या शहरांसाठी सेवा सूरू करण्याची तयारी गतिमान करण्यात आलेली आहे.

त्यानुसार विमानतळावर विविध यंत्रणा उभारण्याचे काम गतीमान झाले असून, लवकरच विमान सुरू करण्याच्या दृष्टीने तयारी करण्यात आलेली आहे.सिव्हिल एव्हिएशनकडून (civil aviation) समर शेड्यूलमध्ये 27 मार्च ते 29 ऑक्टोबर 2022 पर्यंत स्पाइस जेट ला स्लॉट मिळाला असल्याचे वृत्त असले तरी ही सेवा केव्हा सुरू करणार याबाबत स्पष्टता आलेली नसल्याचे चित्र आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com