उन्हाळी हंगामात मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या

प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाचा निर्णय
उन्हाळी हंगामात मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

उन्हाळी हंगामात ( Summer Season )प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने ( Central Railway )लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई आणि बलिया/गोरखपूर दरम्यान 182 उन्हाळी विशेष गाड्या ( Special Trains )चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई - बलिया त्रै-साप्ताहिक विशेष (78 फेर्‍या) : दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 14.15 वाजता सुटेल आणि बलिया येथे तिसर्‍या दिवशी 01.45 वाजता पोहोचेल.

01026 विशेष दि. 3.4.2022 ते 1.7.2022 पर्यंत दर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी बलिया येथून 15.15 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसर्‍या दिवशी 03.35 वाजता पोहोचेल.

या गाड्यांचे थांबे कल्याण, नाशिकरोड, भुसावळ, हरदा, इटारसी, राणी कमलापती, बिना, ललितपूर, टिकमगड, खरगापूर, महाराज छत्रसाल स्टेशन छतरपूर, खजुराहो, महोबा, बांदा, चित्रकुटधाम कारवी, माणिकपूर, प्रयागराज, ग्यानपूर, वाराणसी, औंडिहार, मऊ आणि रसडा असे आहेत.

मुंबई - गोरखपूर आठवड्यातून 4 वेळा विशेष (104 फेर्‍या) असून दि. 2.4.2022 ते 30.6.2022 पर्यंत दर मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 14.15 वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे तिसर्‍या दिवशी 02.45 वाजता पोहोचेल. 01028 विशेष (आठवड्यातून 4 वेळा) दि. 4.4.2022 ते 2.7.2022 पर्यंत दर सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी गोरखपूर येथून 14.25 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसर्‍या दिवशी 03.35 वाजता पोहोचेल.

थांबे: कल्याण, नाशिकरोड, भुसावळ, हरदा, इटारसी, राणी कमलापती, बिना, ललितपूर, टिकमगड, खरगापूर, महाराज छत्रसाल स्टेशन छतरपूर, खजुराहो, महोबा, बांदा, चित्रकुटधाम कारवी, माणिकपूर, प्रयागराज, ग्यानपूर, वाराणसी रोड, मऊ, भटनी आणि देवरिया

एक द्वितीय वातानुकूलित, 4 तृतीय वातानुकूलित, 11 शयनयान आणि गार्ड ब्रेक व्हॅनसह 6 सामान्य द्वितीय श्रेणी. तसेच यासाठी आरक्षण विशेष ट्रेन क्रमांक 01025 आणि 01027 साठी विशेष शुल्कासह बुकिंग संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर रेल्वेच्या संकेतस्थळावर होईल.

Related Stories

No stories found.