Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याउद्यापासून विधिमंडळाचे विशेष अधिवेशन

उद्यापासून विधिमंडळाचे विशेष अधिवेशन

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

राज्य मंत्रिमंडळाचे विशेष अधिवेशन येत्या २ आणि ३ जुलै रोजी आयोजित करण्याचा निर्णय गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis)यांच्यासमवेत बैठक घेतली. या बैठकीत विधिमंडळाचे अधिवेशन घेऊन सरकारवरील विश्वसदर्शक ठराव संमत करून घेण्यात येणार आहे.

विधानसभेचे उपाध्यक्षपद फेब्रुवारी २०२१ पासून रिक्त आहे. या रिक्त पदासाठी पहिल्याच दिवशी निवडणूक घेतली जाईल. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नरहरी झिरवळ हे विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत. त्यांनी यापूर्वी शिवसेनेच्या पत्रावरून शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी अजय चौधरी यांच्या निवडीला मान्यता दिली आहे.

शिवाय झिरवाळ यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह १६ बंडखोर आमदारांना अपत्रतेची नोटीस बजावली आहे. तूर्त हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून त्यावर येत्या १२ जुलैला सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी, अध्यक्ष नेमून पुढील सूत्रे आपल्या हातात घेण्याची रणनीती आहे.

नव्या अध्यक्षांकडून विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून शिंदे तसेच मुख्य प्रतोद म्हणून भरत गोगावले यांच्या नावाला मान्यता घेतली जाईल. तसेच पक्षांतर बंदी कायद्यातील तरतुदीनुसार एकनाथ शिंदे यांना आपल्या गटाच्या विलीनीकरणाचा निर्णय घ्यावा लागेल. शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांचा समेट झाला नाही तर त्यांच्यासमोर बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती किंवा अन्य पक्षाचा पर्याय असेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या