Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याशिंदे गटाच्या मेळाव्यात स्टेजवरील 'ती' विशेष खूर्ची कुणासाठी?

शिंदे गटाच्या मेळाव्यात स्टेजवरील ‘ती’ विशेष खूर्ची कुणासाठी?

मुंबई | Mumbai

यंदा पहिल्यांदाच मुंबईत दोन दसरा मेळावे होत आहेत. शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा तर बीकेसी मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा होत आहे. दोन्ही मेळाव्यांसाठी राज्यातून कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहेत. दोन्ही मैदान कार्यकर्त्यांनी भरगच्च भरले आहे…

- Advertisement -

बीकेसी मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याच्या स्टेजवर एक खास खूर्ची ठेवण्यात आली आहे. या खूर्चीवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विशेष स्थान देऊन मानवंदना देण्यात येणार आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईत उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा घेतला होता. या मेळाव्यामध्ये संजय राऊत यांच्यासाठीही खास खूर्ची ठेवण्यात आली होती.

संजय राऊत हे सध्या पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणातल्या आरोपांखाली आर्थर रोड जेलमध्ये आहेत. उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातही संजय राऊत यांच्यासाठी स्पेशल खूर्ची ठेवण्यात येणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या