मविआला मोठा झटका; देशमुख-मलिकांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

मविआला मोठा झटका; देशमुख-मलिकांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

मुंबई । Mumbai

राज्यसभा निवडणुकीला (Rajyasabha Election) आता अवघा एक दिवस राहिला आहे. यामुळे राजकीय गोटात वाटाघाटींना वेग आला आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी बैठकांवर बैठका घेत असून आपल्या आमदारांना हॉटेल्समध्ये मुक्कामी ठेवले आहे...

याच पार्श्वभूमीवर राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha elections) सध्या न्यायालयीन कोठडीत (judicial custody) असलेले राष्ट्रवादीचे (NCP) नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab Malik) यांना राज्यसभेच्या मतदानसाठी (voting) परवानगी मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्यांनी विशेष पीएमएलए न्यायालयात (PMLA court) अर्ज दाखल केला होता.

यासंदर्भात आज न्यायालयात सुनावणी झाली असता न्यायालयाने अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता अनिल देशमुख आणि नवाब मलिक मुंबई उच्च न्यायालयात अपिल करु शकतात.

दरम्यान, अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या जामीन अर्जाला ईडीने (ED) विरोध दर्शवला होता. कैद्यांना (prisoners) मतदानाचा अधिकारच नसल्याचा दावाही ईडीने न्यायालयात केला. बुधवारी (८ जून) दिवसभराच्या युक्तिवादानंतर मुंबई सत्र न्यायालयातील (Mumbai Sessions Court) विशेष कोर्टाने आपला निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर गुरुवारी (९ जून) न्यायाधीशांनी आपला निर्णय दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com