Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यासंजय राऊतांना दिलासा नाहीच; तुरुंगातील मुक्काम वाढला

संजय राऊतांना दिलासा नाहीच; तुरुंगातील मुक्काम वाढला

मुंबई | Mumbai

शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. त्यांना ५ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

- Advertisement -

गोरेगाव पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी (Patra Chawl land scam case) ईडीने (ED) संजय राऊतांना एक ऑगस्टला नऊ तासांच्या चौकशीनंतर अटक केली होती. त्यानंतर दोन वेळा जामीन नाकारत ईडीने त्यांची कोठडी कायम ठेवली. त्यामुळे आज पुन्हा एकदा कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीनंतर ५ सप्टेंबरपर्यंत त्यांची कोठडी कायम ठेवण्याचं कोर्टानं स्पष्ट केलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या