Friday, May 10, 2024
Homeमुख्य बातम्यानिवडणूक आयोगाकडून राज्यातील सर्व महापालिकांंना विशेष आदेश

निवडणूक आयोगाकडून राज्यातील सर्व महापालिकांंना विशेष आदेश

नाशिक । प्रतिनिधी Nashik

ओबीसी आरक्षण ( OBC Reservation) तसेच करोनाच्या ( Corona) पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका निवडणूक ( NMC Elections )कधी होणार हे नक्की नसले तरी प्रशासकीय पातळीवर तसेच निवडणूक आयोगाकडून सर्व प्रकारची कामे करण्यात येत आहे. सध्या मतदार यादीवरील हरकतींचा निपटारा करण्याचे काम सुरू आहे.तर निवडणूक आयोगाकडून राज्यातील सर्व महापालिका आयुक्तांना आदेश देऊन मुंबई व्यतिरिक्त इतर ठिकाणी चार ते पाच प्रभागांकरिता एक निर्णय अधिकारी याप्रमाणे उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकार्‍यांंची नेमणूक करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

- Advertisement -

यानुसार नाशिक महापालिकेतील एकूण 44 प्रभाग करिता सुमारे 11 उपजिल्हाधिकारी दर्जाचे निवडणूक निर्णय अधिकारी लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी विशेष आदेश देत याबाबत राज्यातील सर्व महापालिका आयुक्त तसेच संबंधित अधिकार्‍यांना सूचनांची यादी रवाना केली आहे.

बृहन्मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता दहा ते पंधरा प्रभागांकरिता एक याप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी राहणार आहे. राज्यातील इतर महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता चार ते पाच प्रभागांकरिता एक याप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी राहणार आहे. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महापालिका आयुक्त हे उपजिल्हाधिकारी पदाच्या दर्जा पेक्षा कमी नाही अशा अधिकार्‍यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करणार आहे.

त्याचप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी त्या जिल्ह्याचा स्थानिक रहिवासी नसावा तसेच तो अधिकारी मागील तीन वर्षापासून एकाच पदावर कार्यरत नसावा व तो संबंधित जिल्ह्यातील मागील चार वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून नियुक्त नसावा, असे आदेश देण्यात आले आहे.

आचारसंहिता कक्ष

महापालिका आयुक्त निवडणूक आचारसंहितेची संबंधित सर्व कामकाज हाताळण्यासाठी आचारसंहिता पक्ष स्थापन करतील, असे आदेशात म्हटले आहे तसेच कक्षाच्या प्रमुख म्हणून उपजिल्हाधिकारी संवर्गातील एक अधिकारी नियुक्ती करतील. तसेच उमेदवारांचा निवडणूक खर्चाचा हिशोब तपासण्यात एक कक्ष तयार करण्याच्या सूचना देखील देण्यात आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या