ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांना विशेष प्रोत्साहन

राज्यात ३ हजार मे.ट.ऑक्सिजन उत्पादनाचे उद्दीष्ट
ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांना विशेष प्रोत्साहन

मुंबई । प्रतिनिधी

राज्यात ३ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादनाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून महाराष्ट्र मिशन ऑक्सिजन स्वावलंबन अंतर्गत उद्योग घटकांना विशेष प्रोत्साहन मंजूर करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

त्यानुसार वैद्यकीय ऑक्सिजन उत्पादित करणाऱ्या कंपन्यांना नोंदणी शुल्क, विद्युत शुल्क, जीएसटी आदींमध्ये सवलत देण्यात येणार आहे.

येत्या चार-पाच महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे राज्यात मोठया प्रमाणात प्राणवायूचा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्याची प्राणवायू निर्मितीची क्षमता सद्य:स्थितीत १ हजार ३०० मे.टन/प्रतिदिन असताना १ हजार ८०० मे.टन एवढया प्राणवायूची मागणी आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे ही मागणी २ हजार ३०० मे.टन इतकी वाढण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या अनुषंगाने तातडीने ऑक्सिजन निर्मिती आणि साठा वाढविणे, क्रिटीकल गॅप शोधून कार्यवाही करणे, लॉजिस्टीक ट्रान्सपोर्ट वर उपाययोजना करणे, इत्यादी उपाययोजना करुन राज्य ऑक्सिजन निर्मिती क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी तसेच आवश्यक ऑक्सिजन निर्मितीचे उदिष्ट साध्य करण्यासाठी उद्योग घटकांना विशेष प्रोत्साहने मंजुर करण्याचा आणि याअनुषंगाने इतर उपाययोजना राज्यामध्ये निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com