Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्हा परिषदेतर्फे विशेष ग्रामसभेचे आयोजन

जिल्हा परिषदेतर्फे विशेष ग्रामसभेचे आयोजन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उपक्रमांसाठी जिल्हा परिषदेतर्फे जिल्ह्यातील ( Zilla Parishad Nashik )ग्रामपंचायतींमध्ये सोमवार दि.25 ते 29 जुलै दरम्यान विशेष ग्रामसभांचे (Gram Sabhas) आयोजन करण्यात येणार आहे. 11 ऑगस्ट 2022 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्याबाबत या ग्रामसभेत माहिती दिली जाणार आहे.

- Advertisement -

घरोघरी तिरंगा हा उत्सव प्रत्येक व्यक्तीचा, कुटुंबाचा असून या कालावधीमध्ये गावातील सर्व नागरिकांनी ग्रामपंचायत येथून तिरंगा ध्वज विकत घेऊन आपल्या घरावर सन्मानाने तिरंगा लावण्याचा उपक्रम यशस्वी करून अमृत महोत्सव हा साजरा करावा. त्याचबरोबर जल जीवन मिशन अभियानांतर्गत शंभर टक्के नळ जोडणी झालेल्या गावांमध्ये संदर्भाधीन शासन परिपत्रकानुसार हर घर जल घोषित करण्याबाबत ग्रामसभेचा ठराव घेण्यात येणार आहे.

तसेच लोकवर्गणी व पाणी पट्टी जमा करण्याबाबत निर्धार करुन त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष मोहीम हाती घेण्यात यावी. कोव्हिडचा प्रथम डोस प्राप्त झालेल्या 12 वर्षांवरील बालकांना व नागरिकांना योग्य अंतराने कोव्हिड लसीचा व्दितीय डोस देणे आणि 18 वर्षांवरील नागरिकांना व्दितीय डोसनंतर 6 महिन्यांनी कोविड लसीकरण अमृत महोत्सव अंतर्गत 30 सप्टेंबर 2022 पर्यंत आपल्या ग्रामपंचायतीजवळच्या शासकीय कोविड लसीकरण केंद्रावर मोफत प्रतिबंधात्मक बूस्टर डोस घेण्याबाबत जनजागृतीसाठी करावी. यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या निर्देशानुसार 25 जुलै ते 29 जुलै या कालावधीत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आल्याचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी सांगितले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात येणार्‍या विशेष ग्रामसभेत गावातील प्रत्येक नागरिकाने सहभाग घेऊन घरोघरी तिरंगा या उपक्रमासाठी योगदान द्यावे. 12 ते 18 वयोगटातील बालकांनी व 18 वर्षांवरील सर्व नागरिकांनी करोना प्रतिबंधक लस घ्यावी. जल जीवन मिशन अंतर्गत शंभर टक्के नळ जोडणी झालेल्या गावांमध्ये ‘हर घर जल’ घोषित करण्याबाबत ठराव घ्यावा.

– लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक, जि.प.

- Advertisment -

ताज्या बातम्या