नाशिक महानगर पालिकेची आज विशेष महासभा

नाशिक महानगर पालिकेची आज विशेष महासभा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मागील अनेक वर्षापासून महापालिकेत भरती प्रक्रिया Municipal recruitment process झालेली नाही. मध्यंतरी राज्य शासनाने भरतीची परवानगी दिली होती. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर ती रद्द करून फक्त अत्यावश्यक सेवेतील पदे भरण्याची परवानगी दिली. आता महापालिकेत नोकर भरतीसाठी recruitment आज विशेष महासभा NMC -Special general meeting होत आहे. भरती झाल्यास महापालिकेच्या कारभारात सुधारणा येऊन महापालिकेचे कामकाज अधिक गतिमान होण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त होत आहे.

महापालिकेतील सतत सेवक सेवानिवृत्त होत असून सेच्छानिवृत्ती घेण्याचे प्रकार देखील मागील काही वर्षात वाढले आहे. यामुळे मनपात सेवक संख्या दिवसेंदिवस कमी असून नवीन नोकरभरतीसाठी सरकारकडून परवागी मिळत नाही. या पार्श्वभूमीवर पालिकेत मानधनावर भरती करण्याची मागणी नगरसेवकांकडून होत आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी बुधवारी (दि. 17) महापालिकेची विशेष महासभा ठेण्यात आली आहे.

स्थायी समिती सभापती गणेश गिते यांच्यासह पाच सदस्यांच्या प्रस्तावावर ही सभा होणार आहे. यावेळी विभागनिहाय रिक्त जागांवर चर्चा होऊ शकते. महासभेने मानधनावर भरतीप्रक्रियेस मान्यता दिल्यास अपुर्‍या मनुष्यबळाचा सामना करणार्‍या महापालिकेला दिलासा मिळणार आहे.

शहराचा दरवर्षी विस्तार होत असून लोकसंख्येत देखील वाढ होत आहे. या तुलनेत शहराचा कारभार हाकणार्‍या पालिकेत मनुष्यबळाची टंचाई भासत आहे. पालिकेच्या आस्थापना परिशिष्टावर विविध संवर्गातील एकूण 7 हजार 90 पदे मंजूर असून त्यापैकी सुमारे 2400 पदे रिक्त झाली आहेत. पाच वर्षांपूर्वी नाशिक महापालिकेचा ब वर्गात समावेश झाला. त्यानुसार महापालिकेने 14 हजार 700 कर्मचारी संख्येचा सुधारित आकृतिबंध राज्य शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला आहे. मात्र त्यानंतरही भरती प्रक्रिया होऊ शकली नाही. त्यामुळे मानधनावर भरतीबाबत महासभेत चर्चा होणार आहे. महासभेने मंजूरी दिल्यास 11 महिने कालावधीने कर्मचार्‍यांची भरती होईल.

नागरिक महापालिकेला विविध प्रकारे कर भरतात. महापालिकेची जबाबदारी आहे त्यांना चांगल्या मूलभूत सुविधा देण्याची. अपुर्‍या मनुष्यबळामुळे ते शक्य होत नाही. महापालिकेत भरती प्रक्रिया व्हावी, यासाठी मी सतत पाठपुरावा केला आहे. मानधनावर भरती झाल्यास आणखी चांगल्या प्रकारे नागरिकांना सुविधा देता येईल. मनपात भरती आवश्यक आहे.

- सतीश कुलकर्णी, महापौर Satish Kulkarni- Mayor

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com