Dipak Panday Nashik
Dipak Panday Nashik

पाेलिसांसाठी स्वतंत्र कराेना रूग्णालय

पाेलीस आयुक्तांची घाेषणा

नाशिक | प्रतिनिधी

कराेना संकटात ग्राऊंड लेव्हलवर पाेलीसच काम करत आहेत. सध्या शहर पाेलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनाेबल वाढविणे गरजेचे आहे. पाेलिसांना कराेनाची लागण हाेऊच नये, यासाठी जे याेग्य आहे ते सर्व केले जाईल....

सध्या शहर पाेलिसांसाठी स्वतंत्र काेविड रूग्णालय तत्काळ सुरू करण्याची कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती शहराचे नवनियुक्त पाेलीस आयुक्त दिपक पांडेय् यांनी साेमवारी दिली.

पाेलीस आयुक्त दिपक पांडे यांनी साेमवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी बाेलतांना सांगितले की, सर्वप्रथम ‘कराेना’ वर सर्व लक्ष्य केंद्रित त्यासंदर्भात प्राधान्याने काय करता येईल, यासाठी काम सुरू केले आहे.

तसेच विशेष करून पाेलीसांसाठी ६ रूग्णवाहिका कार्यान्वित केल्या जात अाहे,असे त्यांनी स्पष्ट केले. कराेना काळात गुन्हेगारी म्हणजेच भाग १ ते ५ चे गुन्हे कमी झाले असले तरी घरगुती हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत.

पाेलिसांंमध्ये भितीचे वातावरण राहणार नाही, यासाठी जनजागृती केली जाईल. पाेलीसांना कराेना लागणचा व मृत्यूचा आकडा शून्यावर आणला जाईल, असे पांडेय् यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com