महापालिकेची विशेष मोहीम; पाणीपट्टी वसुलीसाठी अभियंते मैदानात

महापालिकेची विशेष मोहीम; पाणीपट्टी वसुलीसाठी अभियंते मैदानात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मनपाच्या उत्पान्नातील महत्याचे कर (tax) म्हणजे घरपट्टी (house tax) व पाणीपट्टी (water tax) होय. वेळोवेळी सूचना देऊनही पाणीपट्टीची थकबाकीदार कर भरणा करीत नसल्याने

महापालिकेने घरपट्टी (house tax) पाठोपाठ पाणीपट्टीच्या थकबाकी वसूलीसाठी (Recovery of arrears) विशेष मोहीम हाती घेतली आहे. पाणीपट्टी वसुलीची जबाबदारी आता विभागीय अधिकार्‍यांच्या जोडीला उपअभियंत्यांच्या नेतृत्वाखालील पथकाकडे सोपवण्यात आलीआहे. नागरकांनी पाणीपट्टी थकबाकी अदा न केल्यास थेट नळजोडणी खंडीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आर्थिक वर्ष संपण्यासाठी महिनाभराचा अवधी शिल्लक असल्याने मनपाने थकीत करवसुलीचे उद्दीष्ट्य गाठण्यासाठी कठोर पावले उचललेली आहेत. घरपट्टीच्या (house tax) थकबाकी वसुलीसाठी (Recovery of arrears) मिळकतधारकांना जप्ती वॉरंट बजावतानाच आता पाणीपट्टीच्या थकबाकी वसुलीसाठी देखील विशेष मोहिमेचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

आता शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता व उप अभियंत्यांच्या माध्यमातुन पाणीपट्टीची वसुली होणार आहे. विशेष वसुली मोहिमेमध्ये विभागीय अधिकारी हे समन्वयकाची भूमिका पार पाडणार आहेत.यासाठी विभागनिहाय अभियंत्यांची पथके स्थापन करण्यात आली आहेत. थकबाकी भरण्यास असमर्थता दर्शविल्यास तत्काळ नळ जोडणी खंडित केली जाणार आहे.

खंडित केलेले नळ जोडणी (water conection) अवैधरित्या जोडून घेतल्यास नळ जोडणी धारकाविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नळ जोडणीधारकांनी थकबाकी नळ जोडणी धारकाने येत्या महिनाभरात पाणीपट्टीची सुमारे वीस ते पंचवीस कोटी रुपयांची थकबाकी वसुल करण्याचे उद्दीष्ट्य आहे. त्यादृष्टीने थकबाकीदारांविरोधात कठोर पावलं उचलावी लागत आहेत.

उपायुक्त (कर), मनपा. विशेष मोहिमेसाठी विभागनिहाय पथके नाशिक पश्चिम विभागात पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता संजय अडेसरा, कनिष्ठ अभियंता राजेंद्र घेगडमल व दयानंद अहिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सातपूर विभागात पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता रवींद्र पाटील व कनिष्ठ अभियंता शोएब मोमीन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पूर्व विभागात पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता एच.पी.नाईक, कनिष्ठ अभियंता एस.एन.गवळी, एस.एम.शिंदे व शाखा अभियंता प्रेमचंद पवार, पंचवटी विभागामध्ये पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता आर. जी. चव्हाण, कनिष्ठ अभियंता जी. के. गोरडे, श्री बागुल नविन नाशिक विभागात पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता जी.पी.पगारे, कनिष्ठ अभियंता डी.के.शिंगाडे, सहाय्यक कनिष्ठ अभियंता जितेंद्र चव्हाण, नाशिक रोड विभागात पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता राजेंद्र ठाकरे, कनिष्ठ अभियंता पी.के.गांगुर्डे, कनिष्ठ अभियंता ए.एल.जेऊघाले व एजाज शेख

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com