जिल्हाधिकारी मांढरे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष पुरस्कार

जिल्हाधिकारी मांढरे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष पुरस्कार

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

करोनामुळे (corona) दोन्ही पालक गमावल्याने अनाथ (Orphan) झालेल्या बालकांना शासनाच्या ‘मदत दूत योजनेचा’ लाभ मिळवून देत त्यांना मायेची उब दिल्याने जिल्हाधिकारी सूरज मांढरे (Collector Suraj Mandhare) यांचा एकात्मिक बालविकास सेवा योजना (Integrated Child Development Services Scheme) विभागाकडून महिला दिनाच्या (Women's Day) अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष पुरस्काराने (Special award at the hands of the Chief Minister) गौरव करण्यात येणार आहे.

दरम्यान, गेल्या दोन वर्षापासून जगासह देशावर करोनाचे संकट (crisis of Corona) आहे. जिल्ह्यात देखील आतापर्यंत पावणे पाच लाख रुग्ण करोनाने बाधित झाले असून यापैकी साधारण 8 हजार 886 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहे, जिल्ह्यातील 40 कुटुंबातील 56 मुलांचे पालक करोनामुळे गतप्राण झाले आहेत.

अशा अनाथ झालेल्या बालकांसाठी योजना आखल्या आहेत त्याची अंमलबजावणी देखील जिल्ह्यात सुरु आहे. त्यातच जिल्ह्यात मिशन वात्सल्य (Mission Vatsalya) अंतर्गत 46 योजना एकाच छताखाली आणण्यात आल्या आहेत. अनाथ बालकांना पाच लाख रुपये प्रत्येकी मदत करण्याचे देखील योजनांमध्ये नमूद आहे. तसेच या मुलांना दरमहा 1100 रुपये शैक्षणिक शिष्यवृत्ती (Academic Scholarship) देण्यात येणार आहे.

त्यातून मुलांना रक्कम मिळते का? ही मुले पुढील आयुष्य कसे जगणार ? काही अनाथ बालके आजी आजोबा तर काही बालके मामा काका यांच्याकड वास्तव्याला आहेत. त्यांना एकटेपणा वाटायला नको त्यामुळे प्रत्येक अधिकार्‍याने जबाबदारी घेणे ठरविण्यात आले आहे. महसूल विभागातील जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, मुख्यालयातील काही उपजिल्हाधिकारी, काही तहसीलदार तर तालुक्यातील प्रत्येक प्रांत आणि प्रत्येक तहसीलदार अशा एकून 40 महसूल अधिकार्‍यांनी अनाथांची जबाबदारी ऐच्छिकरित्या स्वीकारली आहे.

या जबाबदारी घेताना अधिकार्‍यांनी नावानिशी जबाबदारी घेतली आहे; म्हणजेच भविष्यात अधिकार्‍यांची सेवा बजावताना बदली जरी झाली तरी ते स्वतः या मुलांवर लक्ष ठेवणार आहेत. करोनात दोन्ही पालक गमावल्याने झालेल्या भावनिक आघातांबरोबरच या बालकांना सामाजिक (social), आर्थिक (financial) आणि शैक्षणिक (Academic) समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. काहींच्या नातेवाईकांना हा अतिरिक्त भार उचलणे कठीण जात आहे. नाशिकमध्ये अशी 40 कुटुंबातील 58 बालके आहेत. जिल्हाधिकारी मांढरे यांनी त्यांना सरकारी मदत मिळवून दिली. शासनाने 25 योजनांद्वारे मदत देण्याचे जाहीर केले.

नाशिकमध्ये (nashik) सर्व विभागाच्या मिळून 50 वर योजनांतून या बालकांना जिल्हाधिकार्‍यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. मृत पालकांच्या मालमत्तेवर बालकांच्या नाव लागले पाहिजे, बँक इत्यादी खात्यामधील निधी वर्ग झाला पाहिजे, कर्ज वगैरे असल्यास ती वसुली थांबवली पाहिजे, त्यांना आश्रय देणारी कुटुंबे बळकट केली पाहिजे आणि एनजीओकडून मिळू शकणारी मदत सर्वतोपरी त्यांच्यापर्यंत पोहोचविली पाहिजे यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले.

त्यादृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयामधील कर्मचार्‍यांनी 40 अधिकार्‍यांनी त्यांचे पालक होण्याचे ठरवले. जिल्हाधिकारी मांढरे यांच्या या कार्याची दखल एकात्मिक बालविकास सेवा योजना विभागाने घेतली. महिला दिनी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार्‍या सोहळ्यात विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com