सोनिया गांधी पुन्हा करोना पॉझिटिव्ह

सोनिया गांधी
सोनिया गांधी

नवी दिल्ली | New Delhi

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi)काही महिन्यापूर्वीच करोना (corona) मुक्त झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session Parliament) हजेरी लावली होती.

यानंतर आता पुन्हा एकदा त्यांना करोनाची लागण (Corona infection) झाली आहे. यासंदर्भात काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी माहिती दिली आहे.

जयराम रमेश यांनी ट्विट करत म्हटले की, आज सोनिया गांधी यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तसेच सोनिया गांधी सरकारच्या नियमांचे पालन करत असून आता त्या आयसोलेशनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, मागील काही काळामध्ये काँग्रेसच्या अनेक नेत्यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. यामध्ये काँग्रेसच्या सचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) पवन खेरा (Pawan Khera) राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लीकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांचा समावेश आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com