Thursday, April 25, 2024
Homeजळगावसोनवणेंनी लगावली लक्ष्मण पाटलांच्या नातेवाईकाच्या कानशिलात

सोनवणेंनी लगावली लक्ष्मण पाटलांच्या नातेवाईकाच्या कानशिलात

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती (Jalgaon Agricultural Produce Market Committee) सभापती निवडीवेळी (election of the Speaker) महाविकास आघाडीच्या -(Mahavikas Aghadi)संचालकांमध्येच मोठा दांगडो (Big Dangdo) झाला. सभापतीपदासाठी अर्ज दाखल केल्याच्या कारणावरून शामकांत सोनवणे यांनी मुलाच्या साडुच्या कानशिलात लगावून उमेदवाराचा अर्ज फाडल्याचा आरोप कृउबास संचालक लक्ष्मण पाटील उर्फ लकी टेलर यांनी पत्रकारांशी बोलतांना केला. यावेळी लकी टेलर अक्षरश: ढसाढसा रडल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान नवनिर्वाचित सभापती शामकांत सोनवणे यांनी हे आरोप फेटाळून लावले.

- Advertisement -

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदासाठी आज निवड प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेच्या सुरूवातीला पॅनलप्रमुख गुलाबराव देवकर, सुनील महाजन यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व संचालकांची सभापतींच्या दालनात बैठक झाली. सभापती कोण? यावर बंदद्वार चर्चा सुरू असतांना बैठकीत मोठा दांगडो झाला. बंदद्वार चर्चेवेळी शामकांत सोनवणे यांनी मुलाच्या साडुच्या कानशिलात लगावल्याची चर्चा होती. हा प्रकार घडल्यानंतर लक्ष्मण पाटील हे बैठक सोडून दालनाबाहेर येत शामकांत सोनवणे व दिलीप पाटील हे धमकावत असून त्यांनी मुलाच्या साडुच्या कानशिलात लगावून अर्ज फाडल्याचा आरोप केला. याप्रसंगी मोठा गदारोळ झाला.

ही लोकशाही की हुकूमशाही – लक्ष्मण पाटील

जळगाव कृउबा समिती सभापती निवडीसाठी चर्चा होऊन प्रथम सभापती पदाच्या निवडीवरून ही लोकशाही आहे की हुकूमशाही ? असा प्रश्न लक्ष्मण पाटील यांनी उपस्थित करीत पोलिसांना बंदोबस्त वाढविण्यास सांगूनही या निवडणुकीत पोलीस मदतीला आले नसल्याचा आरोप केला. दोन पोलीस व एक महिला पोलीस तैनात करण्यात आल्याने त्यांनी पोलीस बंदोबस्तावरुन पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला. दरम्यान, लक्ष्मण पाटील यांनी केलेले आरोप चुकीचे असून तसा कोणताही प्रकार घडला नाही. महाविकास आघाडीकडून उमेदवारी दिल्याने सभापती विजयी झालो, अशी पुष्टी देत शामकांत सोनवणे यांनी आरोपाचे खंडन केले.

सभापती निवडीनंतर दोघांचे एकत्र फोटोसेशन

सभापती निवडीनंतर लक्ष्मण पाटील व शामकांत सोनवणे या दोघांनी एकत्र फोटोसेशन करुन वादावर पडदा टाकला. या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीमध्ये बिघाडी असल्याचे चित्र असून भाजप आणि शिंदे गटाने खेळी करून श्यामकांत सोनवणे यांना सभापतीपदी विराजमान केल्याची चर्चा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या