
पुणे | प्रतिनिधी | Pune
जिल्ह्यातील शिरूर (Shirur) न्यायालयाच्या (court) परिसरात नवऱ्याने (husband) बायको (wife) व सासूवर पिस्तुलातून (pistol) गोळया झाडल्याची घटना घडली...
या घटनेत पत्नीचा मृत्यू (death) झाला असून सासू (mother in law) गंभीर जखमी झाली आहे. ही धक्कादायक घटना आज दुपारी घडली. दीपक ढवळे (Deepak Dhawale) (सध्या रा. अंबरनाथ ठाणे. मूळ रा. ढवळगाव, ता. श्रीगोंदा, जिल्हा. अहमदनगर) असे गोळीबार (Firing) करणाऱ्या संशयिताचे नाव आहे.
कौटुंबिक वादातून पती दीपक याने त्याच्या भावाच्या (Brother) मदतीने बायको व सासूवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. त्याच्या या गोळीबारात पत्नीचा मृत्यू झाला असून सासूवर खासगी रुग्णालयात (private hospital) उपचार सुरू आहेत.
दरम्यान, रांजणगाव पोलिस स्टेशनचे (Ranjangaon Police Station) पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे, पोलिस उपनिरीक्षक देविदास कंरडे, शुभांगी कुटे, पो. अंमलदार ब्रम्हा पवार, संतोष औटी, शिरूर पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक अभिजीत पवार यांनी घटनस्थळाला भेट देत पाहणी सुरू केली असून संशयितांचा शोध सुरू आहे.