खडसेंच्या स्वार्थामुळेच जावई तुरुंगात

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचा पलटवॉर
खडसेंच्या स्वार्थामुळेच जावई तुरुंगात

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

भोसरीप्रकरणी अंजली दमानी यांनी आरोप केल्यानंतर सीबीआय चौकशी करण्यात आली. भोसरी येथील प्रकरणात स्वत: घरी सुरक्षित राहून विनाकारण गरीब जावयाला त्यात फसविल्याचा असून खडसे यांच्या स्वार्थामुळेच जावई तुरुंगात आहेत,अशी टीका ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केली. रविवारी ब्राम्हण सभा येथे भाजपाच्या संघटनात्मक बैठकीनंतर ते पत्रकारांशी वार्तालाप करताना ते बोलत होते.

आ.एकनाथराव खडसे यांनी फर्दापूर प्रकरणाबाबत ना.गिरीश महाजन यांच्यावर यापूर्वी टीका केली होती. त्यानंतर रविवारी ना. महाजन यांनी आ.खडसेंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. ना.महाजन पुढे म्हणाले की, आ.एकनाथराव खडसे यांनी विनाकारण जास्त बोलू नये, माझे तोंड उघडले तर लोकं तुम्हाला काळे लावतील. तसेच त्यांचे दुध संघातील चोरीचे प्रकरण पुढे आले आहे,असा इशाराही त्यांनी दिला.

खा.संजय राऊत यांच्याविषयी बोलताना ना.महाजन म्हणाले की, तुमचे राहिलेले आमदार सांभाळा, दहा ते बारा आमदार तुमचे तुम्हीच सांभाळले तरी पराक्रम केला, असे आम्ही समजू, असा टोलाही ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी उबाठा गटाचे खा.संजय राऊत यांना लगावला. तसेच आगामी होणार्‍या निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत. त्यासाठी पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. आगामी काळात जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका निवडणुका आहेत. त्यादृष्टीने कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. पक्ष बांधणीसाठी राज्यभर प्रवास होणार आहे. लोकसभेसाठीची माझ्या नावाबाबत होत असलेल्या चर्चेत तथ्य नसल्याचे सांगत त्यावर त्यांनी पूर्णविराम दिला.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com