Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याएनसीईआरटीकडून दहावीची काही धडे हद्दपार

एनसीईआरटीकडून दहावीची काही धडे हद्दपार

नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi

एनसीईआरटीने मुलांवरील अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अभ्यासक्रम सुधारणा मोहिमेअंतर्गत दहावीच्या पुस्तकातून लोकशाहीसमोरील आव्हाने, राजकीय पक्ष, सत्तासंघर्ष आणि चळवळ यावरचे धडेच हद्दपार केले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा यावरून देशभर प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

एनसीईआरटीने इयत्ता दहावीच्या पुस्तकातून विज्ञान आणि लोकशाही राजकारण अर्थात सायन्स आणि डेमोक्रॅटिक पॉलिटिक्स पार्ट वन या विषयांमधून प्रत्येकी तीन धडे गाळले आहेत. यामध्ये सायन्स विषयातील पिरिऑडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, सोर्सेस ऑफ एनर्जी आणि सस्टेनेबल मॅनेजमेंट ऑफ नॅच्युरल रिसोर्सेस हे तीन धडे वगळण्यात आले आहेत.डेमोक्रॅटिक पॉलिटिक्स पार्ट वन विषयातून पॉप्युलर स्ट्रगल्स अँड मूव्हमेंट्स, पॉलिटिकल पार्टीज आणि चॅलेंजेस टू डेमॉक्रसी हे तीन धडे वगळले आहेत. एकीकडे उत्क्रांतीवादाचा सिद्धांत वगळल्यानंतर निर्माण झालेला वाद अद्याप शमलेला नसताना आता

पुन्हा एकदा नव्याने एनसीईआरटीच्या पुस्तकातून हे धडे वगळल्याने त्यावर शिक्षण आणि राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

दरम्यान, यासंदर्भात एनसीईआरटीने म्हटले आहे की, करोनाच्या महासाथीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांवरील ताण कमी करणं फार महत्त्वाचं झालं आहे. अभ्यासक्रमाची काठिण्य पातळी, विषयांची द्विरुक्ती आणि सध्याच्या काळात गैरलागू ठरलेला मजकूर ही संबंधित धडे वगळण्यामागची महत्त्वाची कारणे ठरली आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या