Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रआरोग्यमंत्री म्हणाले, लॉकडाऊन राहणारच फक्त शिथिलता देणार

आरोग्यमंत्री म्हणाले, लॉकडाऊन राहणारच फक्त शिथिलता देणार

मुंबई :

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लागू केलेला लॉकडाऊन (Lockdown) १ जून रोजी संपणार आहे. त्यामुळे आता हा लॉकडाऊन आणखी वाढणार की नाही? याबाबत स्पष्ट भूमिका बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

- Advertisement -

…तर तुम्हाला टोल भरावा लागणार नाही

आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊनवर चर्चा झाली. अजूनही बरेच जिल्ह्यात कोरोनाचा दर १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. यामुळे लॉकडाऊन उठणार नाही, हे निश्चित आहे. फक्त लॉकडाऊनमधून शिथिलता देण्यात येणार आहे. ही शिथिलता कुठे द्यावी? दुकानांची वेळ कशी असावी, याचा निर्णय दोन दिवसांत टास्क फोर्सशी चर्चा करुन घेण्यात येणार आहे. दोन दिवसांत मुख्यमंत्री हा निर्णय जाहीर करतील.

महाराष्ट्रात करोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मात्र, काही जिल्ह्यातील पॉझिटिव्ही रेट जास्त असल्यानं सरकार अजूनही सावध भूमिकेत आहे. त्यामुळे लॉकडाउन उठवला जाणार की, कायम ठेवला जाणार, अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. अखेर आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्यातील लॉकडाउनसंदर्भातील चित्र स्पष्ट झाले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी १ जूननंतर महाराष्ट्रातील चित्र कसे असेल, याबाबतची सरकारची भूमिका स्पष्ट केली. राज्यातील लॉकडाउन १ जूननंतरही कायम राहणार आहे. मात्र, काही ठिकाणी निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले, मंत्रिमंडळ बैठकीत म्युकरमायकोसिसच्या विषयावरही चर्चा झाली. सर्वच जिल्ह्यांत अद्याप कोरोना रुग्णांच्या संख्येत घसरण झालेली नाही. लॉकडाऊनचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. टास्क फोर्ससोबत बोलून मुख्यमंत्री निर्णय घेतील. लॉकडाऊनचा अंतिम निर्णय अद्याप घेतलेला नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या