काजी गढीचा काही भाग कोसळला; सुदैवाने कुठलीही जीवित हानी नाही

जुने नाशिक | प्रतिनिधी Old Nashik

शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ( Rain )येथील अत्यंत धोकादायक स्थितीत सापडलेल्या काजीगढीचा ( Kajee gadhi)काही भाग आज रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास कोसळला. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही.

अग्निशामक दलाचे अधिकारी , जवान एक बंब घेऊन घटनास्थळी दाखल झाले आहे. कोपऱ्यावरील दोन झोपड्या खाली पडल्याची माहिती मिळाली आहे. महापालिकेचे नगर नियोजन विभागाचे कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल हे देखील घटनास्थळी जात आहे.

गढीचा नदीच्या बाजूने असलेला मातीचा काही भाग ढासळला. दोन दिवसापूर्वी माझी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या ठिकाणी पाहणी करून काजीगढीचा प्रश्न मार्गी लागण्याचे आश्वासन दिले आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *