Biggest Train Accidents In India : भारतातील भीषण रेल्वे अपघात, ज्यांनी देशाला हादरवून सोडले... वाचा, कधी अन् कुठे झालेत अपघात?

Biggest Train Accidents In India : भारतातील भीषण रेल्वे अपघात, ज्यांनी देशाला हादरवून सोडले... वाचा, कधी अन् कुठे झालेत अपघात?

ओडिशातील (Odisha) बालासोर येथील बहनगा बाजार स्टेशनजवळ घडलेला अपघात हृदय हेलावून टाकणारा आहे. अपघाताचे वृत्त शुक्रवारी रात्री टप्प्याने-टप्प्याने समोर आलं. सुरुवातीला कोरोमंडल एक्स्प्रेस (Coromondel Expres) आणि मालगाडी (Goods Train) यांच्यात धडक झाल्याचं वृत्त समोर आलेलं. यानंतर हावडा एक्स्प्रेसच्या (Howrah Express) धडकेचीही बातमी आली. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत तीन गाड्यांमध्ये धडक झाल्याचे स्पष्ट झालं.

या अपघाताचे आतापर्यंत जे फोटो समोर आले आहेत, ते अत्यंत भयावह आहेत. सुरुवातीला मृतांचा आकडा हा ३०, नंतर ५०, नंतर ७० असा वाढत होता. मात्र, आता मृतांचा आकडा हा २८० देखील पुढे गेला आहे. त्यामुळे या अपघाताची तीव्रता किती आहे याचा आपल्याला अंदाज लावता येईल. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार ९०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. दरम्यान, या अपघातामुळे भारतातील आतापर्यंत झालेल्या भीषण अपघातांच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. जाणून घेऊ, आजवर भारतात घडलेल्या भीषण रेल्वे अपघातांबाबत...

बिहारमध्ये ६ जून १९८१ रोजी मानसी आणि सहरसा दरम्यानचा पूल ओलांडताना ट्रेन रुळावरून थेट नदीत कोसळली होती. तब्बल सात डबे या अपघात बागमती नदीत पडले होते. या अपघातात ८०० प्रवाशांचा मृत्यू झाला होता. हा भारतातील आणि जगातील सर्वात धोकादायक रेल्वे अपघातांपैकी एक अपघात समजला जातो.

Biggest Train Accidents In India : भारतातील भीषण रेल्वे अपघात, ज्यांनी देशाला हादरवून सोडले... वाचा, कधी अन् कुठे झालेत अपघात?
Odisha Train Accident : ओडिशातील रेल्वे अपघातानंतर घटनास्थळी परिस्थिती काय? अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO आला समोर

ऑगस्ट १९९५ मध्ये दिल्ली ते कानपूर दरम्यान धावणारी पुरुषोत्तम एक्स्प्रेस उत्तर प्रदेशातील फिरोजाबादजवळ उभ्या असलेल्या कालिंदी एक्स्प्रेसला धडकली. या अपघातात दोन्ही ट्रेनमधील ३६० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला. मॅन्युअल एररमुळे हा अपघात झाल्याची माहिती आहे. रेल्वे रुळावर जनावराचा मृत्यू झाल्यानंतर कालिंदी एक्स्प्रेसचे ब्रेक जाम होऊन ती रुळावर थांबली होती. यावेळी पुरुषोत्तम एक्स्प्रेसलाही याच ट्रॅकवरून धावण्यास परवानगी देण्यात आली होती. यामुळे पुरुषोत्तम एक्सप्रेस ने कालिंदी एक्सप्रेसला मागून धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला होता.

नोव्हेंबर १९९८ मध्ये झालेल्या रेल्वे अपघाताने २१२ प्रवाशांचा बळी गेला. २६ नोव्हेंबर १९९८ रोजी हा अपघात झाला होता. जम्मू तावी-सियालदह एक्सप्रेस खन्ना येथे फ्रंटियर गोल्डन टेंपल मेल धडकली. फ्रंटियर गोल्डन टेंपल मेल रुळावरुन डबे घसरल्याने आगोदरच अपघातग्रस्त झाली होती. त्यातच तावी-सियालदह एक्सप्रेसने धडक दिली. ज्यामुळे मोठा अपघात घडला.

२ ऑगस्ट १९९९ रोजी अवध-आसाम एक्स्प्रेस आणि ब्रह्मपुत्रा मेल यांच्यात उत्तर सीमावर्ती रेल्वेच्या कटिहार विभागात अवध येथे झालेल्या अपघातात सुमारे २६८ लोक ठार झाले. या अपघातात ३५९ हून अधिक जण जखमी झाले आहेत. ब्रह्मपुत्रा मेल भारतीय जवानांना आसाममधून सीमेवर घेऊन जात होती. त्याचवेळी अवध आसाम एक्सप्रेस गुवाहाटीला जात होती. गुस्लारजवळील स्टेशनवर उभी होती. सिग्नल बिघाडामुळे ब्रह्मपुत्रा मेलला त्याच रुळावरून पुढे जाण्यासाठी ग्रीन सिग्नल देण्यात आला. दुपारी दीडच्या सुमारास अवध आसाम एक्स्प्रेसची समोरासमोर धडक झाली.

Biggest Train Accidents In India : भारतातील भीषण रेल्वे अपघात, ज्यांनी देशाला हादरवून सोडले... वाचा, कधी अन् कुठे झालेत अपघात?
सलमान खान ते चिरंजीवी... रेल्वे अपघातातवर सेलिब्रिटींकडून शोक व्यक्त! चाहत्यांना मदतीचं आवाहन..

सप्टेंबर २००२ मध्ये झालेल्या रेल्वे अपघातात १४० प्रवाशांनी आपले प्राण गमावेल. हा अपघात ९ सप्टेंबर २००२ रोजी घडला. देहरी-ऑन-सोन स्थानकांदरम्यानच्या पुलावर हावडा राजधानी एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याने रफीगंज ट्रेनचे दोन डबे नदीत कोसळले आणि हा अपघात घडला.

२८ मे २०१० मध्ये मुंबईकडे जाणारी हावडा कुर्ता लोकमान्य टिळक ज्ञानेश्वरी सुपर एक्स्प्रेस पश्चिम बंगालच्या पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील खेमशिली आणि सदिहा दरम्यान पहाटे १.३० वाजता रुळावरून घसरली. यानंतर मालगाडीने येऊन त्याला धडक दिली. या अपघातात २३५ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता.

ऑक्टोबर २००५ मध्ये आंध्र प्रदेशातील वेलुगोंडाजवळ पॅसेंजर ट्रेनचे अनेक डबे रुळावरून घसरले. या अपघातात ७७ जणांचा मृत्यू झाला होता. तर जुलै २०११ मध्ये फतेहपूरमध्ये मेल ट्रेन रुळावरून घसरल्याने सुमारे ७० लोक ठार झाले होते तर ३०० हून अधिक प्रवाशी या अपघातात जखमी झाले होते.

नोव्हेंबर २०१६ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये एक्सप्रेस ट्रेन रुळावरून घसरल्याने १४६ लोक ठार तर २०० हून अधिक प्रवाशी जखमी झाले होते. तर जानेवारी २०१७ मध्ये आंध्र प्रदेशात प्रवासी ट्रेनचे अनेक डबे रुळावरून घसरल्याने किमान ४१ जणांचा मृत्यू झाला होता.

भारतीय रेल्वेच्या इतिहासात २०१२ हे वर्ष अपघातांच्या बाबतीत अत्यंत वाईट ठरलं. या वर्षी सुमारे १४ अपघाताच्या घटना घडल्या. यामध्ये रेल्वे रुळावरून खाली घसरणे, समोरासमोर धडक, आग यांच्यासारख्या घटनांचा समावेश होता. ३० जुलै रोजी दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या तामिळनाडू एक्सप्रेसच्या एका डब्याला नेल्लोरजवळ आग लागली. यामध्ये ३० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com