Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याआयपीएल लिलावा दरम्यान 'या' नियमांचे पालन करणे बंधनकारक

आयपीएल लिलावा दरम्यान ‘या’ नियमांचे पालन करणे बंधनकारक

चेन्नई l Chennai

इंडियन प्रीमिअर लीगचा १४व्या हंगामाचा लिलाव आज (दि. १८) रोजी चेन्नईत होणार आहे. या लिलावासाठी आठही फ्रँचायझी २९२ खेळाडूंवर बोली लावणार आहेत. आयपीएल २०२१च्या मिनी लिलावासाठी ६१ जागा भरण्यासाठी २९२ खेळाडू शर्यतीत आहेत. पण फ्रँचायझींच्या पर्समध्ये १९६.६ कोटी रुपये आहेत. आयपीएल लिलावासाठी एकूण १११४ खेळाडूंनी आपल्या नावांची नोंदणी केली आहे.

- Advertisement -

आठही संघांनी २९२ खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सोपवली आहे. परंतु लिलावाला सामोरे जाताना आठही संघाना ६ नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. त्यांनी या नियमांचे पालन काटेकोरपणा न केल्यास त्यांना भुर्दंड सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

आयपीएल लिलावात सहभागी होण्यासाठी सर्व संघ चेन्नईत दाखल झाले आहेत. सर्व संघ एक दिवस आधीच पोहोचले आहेत. त्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघांचे प्रशिक्षक स्टीफन प्लेमिंग आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लिलावात सहभागी होणार आहेत. तसेच दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग लिलावात सहभागी होणार नाहीत.

आयपीएल लिलावा संदर्भात सहा नियम जाणून घेऊया :

१. कोणत्याही संघाला त्यांच्या पर्समध्ये उपलब्ध असलेल्या रकमेपेक्षा अधिक बोली लावता येणार नाही.

२. बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या नियमाप्रमाणे सर्व संघाना त्यांच्या एकूण रकमेतील ७५% रक्कम ही सर्व प्लेयर्सवर खर्च करावी लागते. अस करण्यात एखादी फ्रँचायझी अपयशी ठरली. तर त्यांच्या एकूण रकमेतील उर्वरित रक्कम जप्त करण्यात येईल.

३. यंदाचा लिलाव हा मेगा लिलाव होणार नाही. त्यामुळे आरटीएम कार्ड वापरता येणार नाही. आरटीएम म्हणजे राईट टू मॅच.

४. कॅप आणि अनकॅप खेळाडू मिळून भारतीय खेळाडूंची कमीत कमी संख्या १७ आणि जास्तीत जास्त २५ असू शकते.

५. आयपीलच्या संघात ८ खेळाडू हे आंतरराष्ट्रीय असायला हवेत.

: सलिल परांजपे देशदूत नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या