Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याकाळ्या आईला जपायलाच हवे!

काळ्या आईला जपायलाच हवे!

सुरगाणा । प्रतिनिधी | Surgana

माती (soil) ही आपल्या सर्वांची काळी आई आहे. तिला जपायलाच हवे. ते आपले सगळ्यांचे कर्तव्य आहे. ती आपल्याला पोसते असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. मातीने असहकार पुकारला तर काय होईल याच्या कल्पनेने सुद्धा अंगावर काटा येतो.

- Advertisement -

माती ही तर काळी आई

पृथ्वीवर निवास करणार्‍या सुमारे 670 कोटी लोकसंख्येला 95 टक्के अन्न उत्पादन (Food production) करून देणारे माध्यम म्हणजे माती! माती (soil) ही पिकाच्या मुळाला आधार, अन्न आणि पाणी (Food and water) देते. मातीत अहोरात्र कोट्यवधी जीव शेकडो रासायनिक अभिक्रियांद्वारे (Chemical reactions) मातीच्या जडण घडणाचे काम करतात. म्हणून माती हे सजीव माध्यम आहे. कोट्यवधी सूक्ष्म जिवाणूंनी (Microbes) समृद्ध, पोषक अन्नद्रव्ये, हवा आणि पाणी असा सुवर्ण संगम साधलेले माध्यम माती हेच मानवी संस्कृतीच्या विकासाचे उगम स्थान आहे. म्हणून मातीला आपण काळी आई म्हणतो. शेतीसाठी तर मातीचे महत्त्व फारच आहे.

– सुवर्णा गांगोडे, स्ट्रॉबेरी उत्पादक, घोडांबे

मातीचा कर्ब वाढविण्यासाठी सेंद्रिय घटक महत्त्वाचे

सुपीक मातीत (Fertile soil) कुजलेल्या त्याच वनस्पतीमुळे (Plants) मातीचे स्वरूप बदलत गेले आहे. आपल्या मातीमध्ये करोडो जीव असतात, असे शास्त्रज्ञ (Scientist) सांगतात. आपली जमीन हा मर्यादित स्वरूपाचा नैसर्गिक स्त्रोत (Natural resources) असल्यामुळे त्याची योग्य जोपासना करून भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी जमिनीचे आरोग्य सुस्थितीत ठेवणे गरजेचे आहे. तसेच जमिनीच्या प्रकारानुसार पिकांची निवड, माती परीक्षणानुसार खतांचा संतुलित वापर, पिकांची फेरपालट, सेंद्रिय खतांचा (Organic fertilizers) नियमित वापर इत्यादी गोष्टींचा वापर करून जमिनीची सुपिकता टिकवून ठेवणे आणि प्रति हेक्टरी उत्पादकता वाढवणे गरजेचे आहे. पदार्थ आणि खनिज पदार्थ (Minerals) अशा दोन प्रकारच्या पदार्थांनी माती बनते. मातीच्या या प्रक्रियेबाबत शेतकर्‍यांना माहिती करून देण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न झाले तर काही प्रमाणात का होईना माती वाचवता येईल. अन्नधान्याची उत्पादकता वाढवणे अपरिहार्य असल्यामुळे जमिनीची सुपिकता (Fertility of the soil) टिकवणे महत्त्वाचे ठरते. म्हणून मातीचा कर्ब वाढविण्यासाठी शेतकर्‍यांनी सेंद्रिय शेती (Organic farming) करणे महत्त्वाचे आहे.

– जयप्रकाश महाले, प्रगतशील शेतकरी ठाणगाव ता.सुरगाणा

पिकांचे स्वास्थ्य मातीवर अवलंबून!

पिकांचे अस्तित्व मातीच्या आणि पाण्याच्या स्वास्थ्यावर अवलंबून असते. पीक उत्पादनातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे जमीन. सधन कृषी पध्दतीत रासायनिक खतांच्या अनिर्बंध वापरामुळे तसेच तद्नुषंगिक कारणांमुळे जमिनीचा कस कमी होत आहे. त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. मातीचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी माती तपासणी आधारित खतांच्या परिणामकारक वापरास महत्त्व प्राप्त झाले आहे. बाहेरून रासायनिक खते न घालता केवळ मातीमधील जैविक घटकांनी आपले शेत समध्द करून अनेक शेतकरी स्थानिक आणि नैसर्गिक स्त्रोतांपासुन विविध पोषकद्रव्यांनी परिपुर्ण असे अन्नाचे उत्पादन करत आहे. माती हे वनस्पती च्या संतुलित वाढीसाठी आवश्यक पोषक आहे.

– विष्णू ढवळु बोरसे. हरणटेकडी ता.सुरगाणा जि. नासिक

मातीपरिक्षणामुळे अनावश्यक खर्च वाचतो

मातीची सुपिकता टिकवून ठेवण्यासाठी मातीपरिक्षण करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे आपल्या जमिनीमध्ये कोणत्या घटकाची कमतरता आहे याची माहिती मिळते. त्यानुसार आपल्याला कोणत्या खताची मात्रा द्यावी व कोणते खत देऊ नये याची माहिती मिळते. त्यामुळे आपला अनावश्यक खर्च वाचतो व जमिनीची सुपीकता टिकून राहते. जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी अनावश्यक खतांचा वापर टाळावा. सेंद्रिय खतांचा वापर करावा. पालापाचोळा, वनस्पतीचे अवशेष वापरून सुद्धा मातीची सुपीकता टिकवून ठेवता येते.

– ज्ञानेश्वर बालाजीराव कोकणे

- Advertisment -

ताज्या बातम्या