आत्म्याइतकंच मातीला महत्व!

आत्म्याइतकंच मातीला महत्व!

येवला । प्रतिनिधी ( Yeola )

दै.'देशदूत' ( Daily Deshdoot )आणि मराठा विद्या प्रसारक समाज संस्था (Maratha Vidya Prasarak Samaj Sanstha ) यांच्या संयुक्त विद्यमाने 'माती वाचवा' ( Save Soil ) या विषयावर श्री.सद्गुरु ( Shri Sadguru )यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दिनांक 11 जून. वेळ सायंकाळी 5 वाजता. ठिकाण केटीएचएम महाविद्यालय मैदान. त्यानिमित्ताने साधलेला संवाद.

मातीतला शेंद्रिय कर्ब हरवला!

मातीकडे दुर्लक्ष केल्याने दिवसेंदिवस उष्णता वाढत आहे. पाण्याची पातळी खोल जात आहे. रासायनिक खतांचा, कीटकनाशके यांचा मारा कमी करून शेंद्रिय शेती केल्यास माती वाचू शकतो. त्यासाठी माती परीक्षण गरजेचे आहे.

प्रकाश जगताप, येवला

मातीचे पोषण मूल्य वाढवणे गरजेचे

पिकांच्या फेर पालटासह मातीचा सेंद्रिय कर्ब वाढवणे गरजेचे आहे. मातीचं महत्व आता लक्षात घेतलं नाही तर भविष्यात मोठा अनर्थ होऊ शकतो. त्यासाठी शेणखत, पाला पाचोळा, ताग इत्यादी जमिनीत, मातीत मिसळले पाहिजे. शेतीची सध्या उत्पादन क्षमता कमालीची घटली आहे. आता माणसाने सजग होऊन माती वाचवण्यासाठी पाऊले टाकली पाहिजे.

हरिभाऊ महाजन

जमिनीचा पोत सुधारण्यावर भर हवा

एका शेतकर्‍याने एखादे पीक घेतले, अन उत्पादन चांगले आले की, परिसरातील सर्वच शेतकरी तेच पीक घेण्यासाठी प्रयत्न शील असतात. मात्र आपल्या जमिनीचा पोत कसा आहे, माती कशी आहे, या विषयी माहिती करुन घेण्याच्या भानगडीत पडत नाहीत. वास्तविक मातीत दिवसेंदिवस बदल होत आहे. तिची दरवर्षी तपासणी, परीक्षण करणे गरजेचे आहे. तसेच कोणते पीक घेणे योग्य या विषयीही सल्ला घेणं गरजेचं आहे.

ओंकार रंधे, एरंडगाव

आत्म्याइतकंच मातीचं महत्व

माती हा शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याचा विषय. शरीरात जसा आत्मा, तसे जमिनीत मातीचे महत्व आहे. दिवसेंदिवस मातीची उत्पादक क्षमता कमी होत आहे. अशा वेळी शेतकर्‍यांना मार्गदर्शनाची गरज आहे. माती वाचली, तरच माणूस वाचणार आहे.

रावसाहेब ठोंबरे

माती नासते आहे!

पिकांच्या जास्त उत्पादनासाठी स्पर्धा सुरू आहे. त्यासाठी मातीत मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांची भेसळ सुरू आहे. रासायनिक खतांच्या अति वापराने माती नासत चालली आहे. उगवण क्षमतेवर परिणाम होत आहे. अन माणसाच्या आरोग्यावरही दूरगामी परिणाम होत आहे. त्या करिता रासायनिक खतांचा व कीटकनाशके यांचा वापर कमीत कमी करून सेंद्रिय शेतीकडे शेतकर्‍यांनी डोळस पणे पाहिले पाहिजे.

उज्वल जाधव, अंदरसुल

माती परीक्षणासाठी बांधावर अधिकारी पाठवावेत!

राज्यातील अधिकांश शेतकर्‍यांना माती-पाणी या विषयी पुरेशी माहिती अवगत नाही. वारंवार तेच तेच पीक घेतल्याने मातीची उत्पादन क्षमता कमी होते. त्यातच रासायनिक खते, प्रवाही खते, कीटकनाशके यांच्या अति वापराने माती, पाणी खराब झाले आहे. त्या करिता शासनाने कृषी खात्याच्या सहाय्याने शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन माती व पाणी परीक्षण मोफत करून दिल्यास माती वाचेल.

नवनाथ लभडे

माती वाचली तरच माणूस वाचेल!

यांत्रिक शेतीकडे दिवसेंदिवस शेतकर्‍यांचा कल वाढत चालला आहे. मात्र यांत्रिक शेती गरजेची असली तरी गायी, म्हशी, शेळ्या पाळून त्या माध्यमातून खत निर्मिती करून रासायनिक खताऐवजी शेंद्रिय खते गरजेचे आहे. तरच माती टिकणार आहे. माती वाचली तरच माणूस वाचणार आहे.

भाऊसाहेब झांबरे, शेवगे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com