मातीचा कर्ब वाढवणे गरजेचे

मातीचा कर्ब वाढवणे गरजेचे

कळवण । प्रतिनिधी | Kalwan

आपण ज्या शेतीतून जमिनीतून पिके (crop) घेतो त्या जमिनीचा प्रकार (Type of soil) कोणता व त्या जमिनीत कोणती अन्नद्रव्ये (Nutrients) किती प्रमाणात आहेत या सर्व गोष्टींची माहिती करून घ्यायची असेल तर एक वर्षात एकदा तरी माती परीक्षण (Soil testing) करणे गरजेचे आहे. माती परिक्षणामुळे आपल्याला जमिनीची सुपीकता (Soil fertility) व उत्पादकता किती आहे व कोणती अन्नद्रव्ये किती प्रमाणात घालावे याची माहिती मिळते त्यानुसार पिकांच्या लागवडीचे नियोजन करता येते.

- अनु मोरे प्रगतिशील द्राक्ष उत्पादक शेतकरी पिंपळगाव बसवंत

मातीचा सेंद्रीय कर्ब वाढवणे गरजेचे

रासायनिक खतांचा (Chemical fertilizers), कीटकनाशके (Pesticides) यांचा मारा कमी करून सेंद्रीय शेती (Organic farming) केल्यास आपण माती वाचवू शकतो. माती वाचली तरच माणूस वाचणार आहे. मातीचा सेंद्रिय कर्ब (Organic curb) वाढवणे गरजेचे आहे. शेतीची उत्पादन क्षमता कमालीची घटली असून ती वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी दरवर्षी माती परीक्षण करणे गरजेचे आहे.

- अनिल दादाजी पगार, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाइतदार संघ पुणे माजी संचालक

खतांचा गैरवाजवी वापर नको

भारताच्या (india) प्रचंड लोकसंख्येला अन्न उत्पादन (Food production) करून देणारे माध्यम म्हणजे माती. माती पिकाच्या मुळाला आधार, अन्न आणि पाणी देते. मातीत अहोरात्र कोट्यवधी जीव मातीच्या जडण घडणाचे काम करतात. माती परीक्षणामुळे (Soil testing) पीकांना द्यावयाच्या खताची मात्रा ठरवता येते. त्यामुळे गैरवाजवी खते देण्यावर नियंत्रण येते. माती परीक्षण करून त्यानुसार केलेल्या लागवडीमुळे पिकांपासून दोनपटीपेक्षा जास्त आर्थिक लाभ मिळवता येतो. त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो.

- चेतन शिंदे, माती आणि पाणी ही पिकांची संजीवनी

पिकांचे अस्तित्व मातीच्या आणि पाण्याच्या स्वास्थ्यावर अवलंबून असते. पीक उत्पादनातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे जमिन. सधन कृषी पद्धतीत (Intensive farming methods) रासायनिक खतांच्या अनिर्बंधित वापरामुळे तसेच तदनुषंगिक कारणामुळे जमिनीचा कस कमी होत आहे. त्याचा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. मातीचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी माती तपासणी आधारित खतांच्या परिणामकारक वापरास महत्व प्राप्त झाले आहे. बाहेरून रासायनिक खते न घालता केवळ मातीमधील जैविक घटकांनी आपले शेत समृद्ध करून हे शेतकरी स्थानिक आणि नैसर्गिक स्त्रोतांपासूनच विविध पोषकद्रव्यांनी परिपूर्ण असे अन्नाचे उत्पादन करीत आहेत. माती हे वनस्पतींच्या संतुलित वाढीसाठी आवश्यक पोषक द्रव्यांचे कोठार आहे.

- योगेश भामरे प्रगतिशील शेतकरी

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com