Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यासोसायट्या जपत आहेत ‘वाडा संस्कृती’

सोसायट्या जपत आहेत ‘वाडा संस्कृती’

नाशिक । अनिरुद्ध जोशी Nashik

शेकडो वर्षांपासून ‘वाडा संस्कृती’ ही नाशिकचा चेहरा बनली आहे. जसजसा विकास होत चालला आहे तसतशी वाडा संस्कृतीची वाटचाल ही फ्लॅट संस्कृतीकडे होत आहे. मात्र, आज नाशिक शहरातील काही सोसायट्यांनी नाशिकचे वैभव असलेली ‘वाडा संस्कृती’ (Wada culture )जपली आहे.

- Advertisement -

गेल्या काही वर्षांत समाजव्यवस्थेत अनेक परिवर्तने झाली आहेत. नाशिकची ओळख मंत्रभूमीपासून यंत्रभूमीपर्यंत झाली आहे. शहरात अनेक पुरातनकालीन वाडे होते. वाडा संस्कृतीत रहिवाशांमध्ये एकोपा निर्माण झालेला असायचा. जिव्हाळा, आपलेपणा असायचा आणि संकटसमयी परस्परांच्या मदतीला धावून जाणे हे विशेष प्रकर्षाने जाणवायचे.

अजूनही ही संस्कृती जपण्याचा काही वाडे प्रयत्न करत आहे. तसेच नाशकातील अथर्व सोसायटी,बालाजी अपार्टमेंटने वाडा संस्कृतीचे गुणविशेष जपण्यात अग्रेसर आहेत. नाशिकच्या काही सोसायट्यांमध्ये आजही नागरिक एकमेकांच्या अडीअडचणी समजून गुण्यागोविंदाने राहत आहे. आपल्या शेजारील व्यक्तीला सहकार्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. सोसायटीत मंदिर उभारून अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रक्तदान, वर्धापन दिन, भजन कार्यक्रम, गेट टूगेदर असे अनेक उपक्रम सोसायट्या राबवत असून यामुळे आधुनिक नाशिकने आजची आपले वैभव असलेली ‘वाडा संस्कृती’ जपल्याची प्रचिती येते.

आमच्या सोसायटीमध्ये 12 कुटुंब राहत असून सर्व कुटुंब एकमेकांना समजून राहतात. अनेकदा गेट टूगेदर होत असल्याने आपापसातील जिव्हाळा वाढतो. आपण कितीही आधुनिक युगात राहिलो तरी आपल्याला आपली वाडा संस्कृती विसरून चालणार नाही.

भारती कुक्कर, रहिवासी, अथर्व सोसायटी.

आमच्या सोसायटीत प्रत्येकाचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गुरुवारी आणि शनिवारी महिला मंडळाचा भजनाचा कार्यक्रम असतो. तसेच अनेक सामाजिक उपक्रमही राबविले जातात. रविवारी सोसायटीमध्ये स्वच्छता अभियान राबविले जाते. सोसायटीचा वर्धापन दिन दरवर्षी साजरा केला जातो.

देवेश वैद्य, रहिवासी, बालाजी अपार्टमेंट.

- Advertisment -

ताज्या बातम्या