समाज माध्यमे : देशभरात काय झाले?

समाज माध्यमे : देशभरात काय झाले?

नाशिक | प्रतिनिधी Nashik

वर्षभरात समाज माध्यमांमध्ये विविध घटना गाजल्या. त्यातील काही घटना....

जानेवारी 2021

कोविशिल्ड लसीला आपत्कालीन मंजुरी

राज्यात लसीकरणाची रंगीत तालीम; नंदुरबार, पुणे, नागपूर, जालना व नाशिक जिल्ह्याची निवड

राज्यातील बड्या नेत्यांच्या सुरक्षेत कपातीचा निर्णय

सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला भीषण आग; पाच जणांचा होरपळून मृत्यू

फेब्रुवारी 2021

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून अर्थसंकल्प संसदेत

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा राजीनामा

कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन

नाशिकला 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना विमान नाकारले

जळगाव जिल्ह्यात भरधाव ट्रक उलटून 15 मजुरांचा मृत्यू

अजित पवार, विजय वडेट्टीवार, हसन मुश्रीफ यांच्यासह 76 जणांना क्लीन चिट

मार्च 2021

वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली करोना प्रतिबंधक लस

इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत भारत विजयी

आमदारांचा स्थानिक विकास निधी तीनवरून चार कोटी रुपयांवर

सचिन वाझेला दहा दिवसांची कोठडी सुनावली

परमबीर सिंग यांची आयुक्तपदावरून उचलबांगडी

भांडुप आगीत अकरा रुग्णांचा मृत्यू

रात्री 8 ते स. 7 वाजेपर्यंत जमावबंदी

एप्रिल 2021

राज्यात रात्रीची संचारबंदी

शनिवार ते सोमवार संपूर्ण टाळेबंदी

दिलीप वळसे-पाटील नवे गृहमंत्री

करोना प्रतिबंधक लस, रेमडिसीव्हर, ऑक्सिजनचा तुटवडा

अवकाळी पावसाचे थैमान; पिकांचे अतोनात नुकसान

टंचाई भागवण्यासाठी रेल्वेची ऑक्सिजन एक्स्प्रेस

करोनाचा उद्रेक लक्षात घेऊन दहावीची परीक्षा रद्द

मे 2021

पश्चिम बंगाल विधानसभेत तृणमूल विजयी

मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयात रद्द

लॉकडाऊनचा कालावधी 1 जूनपर्यंत वाढवला

तौक्ते चक्रीवादळामुळे सहा जणांचा मृत्यू तर 9 जण जखमी

रशियाची लस स्पुटनिक व्हीचे उत्पादन भारतात

पेट्रोल शंभरी तर डिझेल नव्वदीपार

राज्यात 15 जूनपर्यंत ताळेबंदी

जून/जुलै 2021

राज्यात बारावीच्या परीक्षा रद्द

पाम तेलाच्या आयातीवरील कर 15 टक्क्यांवरून 10 टक्के

सायबर सुरक्षा अनुक्रमणिकेत भारताला दहावे स्थान

मॉडर्ना लसीला भारत सरकारकडून आपत्कालीन मंजुरी

इ-कोर्टस्ला जमिनीच्या रेकॉर्डस्शी जोडले जाणार

राज्यात विविध ठिकाणी दरडी कोसळून 89 बळी तर 34 बेपत्ता

ऑगस्ट 2021

राज्यसभेत नारळ विकास बोर्ड विधेयक पारित

टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राला सुवर्ण

कुस्तीपटू बजरंग पुनियाला कांस्य

नारायण राणेंना अटक

उडाण योजनेअंतर्गत 780 नव्या मार्गांना मंजुरी

भारताकडे 611.149 अरब डॉलर्स परदेशी चलन

41 वर्षांनंतर हॉकीत कांस्यपदक

सप्टेंबर 2021

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाची अकाली एक्झिट

टोकयो पॅराऑलिम्पिकमध्ये भारताच्या सुमित अंतिलला सुवर्ण

अवनी लेखारा हिनेही नेमबाजीत सुवर्णपदक

31 ऑगस्टला अमेरिकेच्या सैन्याचे अखेरच्या विमानाने उड्डाण

सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ नव्या न्यायाधिशांना शपथ देण्यात आली

ऑक्टोबर 2021

केंद्रीय मंत्रिमंडळाने शाळांमध्ये पीएम पोषणला सुरुवात

नोव्हेंबर 2021

तेल अवीव हे इस्रायल सर्वात महागडे शहर, पॅरिस दुसर्‍या तर सिंगापूर तिसर्‍या क्रमांकाचे महागडे शहरे

भारतीय वंशाचे आणि मुंबईकर पराग अग्रवाल झाले ट्विटरचे नवे सीईओ

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डाचेे अध्यक्ष ज्येष्ठ सनदी अधिकारी विवेक जोहरी

डिसेंबर 2021

के. श्रीकांतला जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत रौप्यपदक

राज्यात 2 हजार कुत्र्यांना केनाईन पैववोव्हायरस

राष्ट्रीय एकता गीताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी केले उद्घाटन

चीनमध्ये 6.6 कोटी वर्षांपूर्वी जुना डायनासोरचे भ्रूण सापडले

दिल्लीत पहिले शिक्षकांचे विद्यापीठ

एफडीएकडून एचआयव्ही रोखण्यासाठी एप्रेट्युड इंजक्शनला परवानगी

अमेरिकेने कोविड-19 च्या गोळीला दिली मंजुरी

भारताने प्रलय मिसाईलची चाचणी यशस्वी

फोकस@ नाशिक

राजकीय मिसळ पार्ट्यांना उधाण

नाशिकहून 28 शहरांसाठी विमानसेवा

गिर्यारोहक सुदर्शन कुलथे यांच्याकडून धुळ्यातील लळिंगनजिक रामगड किल्ल्याचा शोध

94 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन नाशिकमध्ये

ज्येष्ठ विज्ञान लेखक डॉ. जयंत नारळीकर यांची अध्यक्षपदी निवड

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचे सादरीकरण

द्वारका हॉटेल काळाच्या पडद्याआड

राजीव गांधी भवनात विरोधी पक्षनेता कार्यालयातील एका खोलीला आग

निओ मेट्रो प्रकल्प नाशिकनगरीत साकारण्यासाठी 2 हजार 92 कोटी

ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवडणुकीला स्थगिती

नाशिकमध्ये दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन

हवा प्रदूषणात नाशिक धोक्याच्या उंबरठ्यावर; जागतिक क्रमवारीत 244 वे

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करोनामुळे स्थगित

लाचखोर पकडण्यात नाशिक विभाग दुसरा

वालदेवीत सहाजण बुडाले

डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गॅस गळती होऊन 22 करोना रुग्ण दगावले

ब्रह्मगिरीसह सह्याद्रीच्या जैवविविधतेलाच सुरूंग

करोनाच्या पार्श्वभूमीवर लग्नसमारंभाला 50 जणांनाच परवानगी

लॉकडाऊनकाळात नाशिकच्या हवेच्या गुणवत्तेत सुधारणा

मनमाड येथे एका तरुणाने तृतीयपंथीयाशी केलेला विवाह चर्चेत

इगतपुरीत रेव्ह पार्टीवर धाड; अभिनेत्री हिना पांचाळसह 22 जणांना अटक

युपीएससी परीक्षांसाठी नाशिकला केंद्र

खासदार डॉ. भारती पवार यांची केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्रिपदी निवड

पारनेर तालुक्यात अप्रकाशित गिरीदुर्गाचा सुदर्शन कुलथे यांनी घेतला शोध

नाशिक विभागाचा दहावीचा निकाल 99.96 टक्के

दोन घटनांत नाशिकच्या सहा जणांवर काळाचा घाला

आठ लाखांच्या लाच प्रकरणात वैशाली झनकर यांना अटक

नाशिकमधील गोदावरी नदीला पूर

भुजबळ-कांदे वाद; छोटा राजन टोळीकडून धमकीचा कांदेंचा दावा

नाशिक-मुंबई महामार्ग काँक्रिटीकरणासाठी 5 हजार कोटी

नगरसेवक संख्येत वाढ; नाशकात 133 तर मालेगावात 95 सदस्य होणार

एसटी संपला हिंसक वळण; नाशकात बसेसवर दगडफेक

मालेगाव बंदला हिंसक वळण

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com