अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी 'इतके' उमेदवारी अर्ज

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी 'इतके' उमेदवारी अर्ज

मुंबई | Mumbai

राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीला (Andheri By-Election) मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवसेना आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या निधनामुळे अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक होत आहे...

३ नोव्हेंबरला या जागेसाठी पोटनिवडणूक (By-Election) होणार असून ६ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी एकूण २५ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तर बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून दोन अर्ज दाखल करण्यात आले आहे. त्यासोबतच संदीप नाईक यांचा एक डमी अर्ज देखील दाखल करण्यात आला आहे.

तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने या निवडणुकीत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने मुरजी पटेल (Murji Patel) यांना रिंगणात उतरवले असून त्यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत.

दरम्यान, या पोटनिवडणुकीसाठी एकूण २५ उमेदवारी अर्ज आले असून या अर्जांची छाननी आज होणार आहे. तर १७ ऑक्टोंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यामुळे माघारीनंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com