विशेष स्वच्छता मोहिमेत 'इतका' अतिरिक्त कचरा केला गोळा

विशेष स्वच्छता मोहिमेत 'इतका' अतिरिक्त कचरा केला गोळा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

तब्बल दोन वर्षांनंतर मोकळ्या वातावरणात नागरिकांनी दिवाळीचा सण ( Diwali Festival -2022 )साजरा केला. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेच्या ( NMC ) वतीने शहरात विशेष स्वच्छता मोहीम (Special Cleanliness Campaign) हाती घेण्यात आली होती. सुमारे साडेतीनशे सेवकांमार्फत ही मोहीम राबवण्यात आली. याकाळात शहरातील व्यावसायिक भागात रात्रीही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. दरम्यान, दोन आठवड्यात दिवाळीकाळात सुमारे 1500 टन अतिरिक्त कचरा गोळा झाला आहे.

नाशिक महापालिकेच्या सहाही विभागांत मोहीम सुरू करण्यात आली होती. 10 ते 26 ऑक्टोबरदरम्यान ही मोहीम राबवण्यात आली. दिवाळीकाळात सरासरी 100 ते 130 मेट्रिक टन कचरा जास्त उचलला जात होता. ओला कचरा, सुका कचरा, घरगुती घातक कचरा, घरगुती घातक वैद्यकीय कचरा, विद्युत कचरा असे वर्गीकरण करण्याचे आवाहन मनपाकडून करण्यात आले होते.

‘माझी दिवाळी, स्वच्छ दिवाळी’ या अनुषंगाने नागरिकांनी सणाचा आनंद लुटावा, शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य करावे तसेच दिवाळीनिमित्त प्लॅस्टिक न वापरण्याचाही संकल्प नागरिकांनी करावा, असे आवाहन मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने केले होते. त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com