मालेगावात गोवरचे 'इतके' रुग्ण; उपचार सुरु

लसीकरण करुन घेण्याचे आयुक्तांकडून आवाहन
मालेगावात गोवरचे 'इतके' रुग्ण; उपचार सुरु

मालेगाव | प्रतिनिधी Malegaon

मागील काही दिवसापासून मुंबईमध्ये सुरु असलेली गोवरची साथ (measles)आता शहरामध्ये देखील पोचली आहे. गोवर साथीच्या आजाराने आतापर्यंत ४४ रुग्ण महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये दाखल झाले असुन त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

गोवर साथ नियंत्रणासाठी तातडीने मनपा प्रशासनाच्या वतीने पाऊले उचलली जात आहे. बहुसंख्य रुग्णांनी गोवरची लस न घेतलेली नसल्याचे निदर्शनास आले आहे. शहरात गोवरचे रुग्ण आढळुन आल्याने पालकांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

पालकांनी काळजी न करता आपल्या कुंटुबातील वय वर्षे ९ महिने ते १८ महिन्याचा बालकांना गोवर डोस दिला आहे की, नाही याची खात्री करावी. गोवर लसीकरण दिले नसेल तर जवळील नागरी आरोग्य केंद्रात, व नियमित लसीकरण होणा-या मदरसा/अंगणवाडी, खाजगी रुग्णालय, येथे जाऊन गोवर लसीकरण करुन घ्यावे. असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक भालचंद्र गोसावी व आरोग्याधिकारी यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com